निरपराधांची हत्या थांबविण्याचा बांग्लादेशला इशारा

ढाका दि.२४ ऑगस्ट- बांग्लादेशमधील विशेष पोलिस दलाने निरपराध लोकांची कत्तल चालविल्याचा आरोप मानवाधिकार संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने बुधवारी केला. बांग्लादेश सरकारने तेथील नागरिकांची बेकायदा हत्या थांबवावी, असा इशाराही अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने दिला आहे.
इतर देशांकडून मदतीसाठी मिळालेली शस्त्रे विशेष पोलिस दल निरपराधांच्या हत्यांसाठी वापरत असल्याचा आरोप अॅमनेस्टीने केला आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदभार सांभाळल्यापासून या विशेष कृती दलाने कमीत कमी २०० जणांची हत्या केल्याचे संस्थेने सांगितले. ही हत्या थांबविण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.