मतदानपूर्व चाचण्यांमध्ये ओबामांना प्रतिस्पर्धी रॉमनीकडून कट्टर झुंज

वॉशिग्टंन दि.२३ ऑगस्ट – अमेरिकेतील राष्ट*ाध्यक्ष निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली असून मतदानपूर्व चाचण्यांमध्ये राष्ट*ाध्यक्ष बराक ओबामा यांना कडवी झूंज द्यावी लागणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे मिट रॉमनी  ओबामाचे प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकरणार असल्याचा अंदाज एका मतदानपूर्व चाचणीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
ओबामांनी राष्ट*अध्यक्षाच्या कार्यकाळात अमेरिकेची रूळावरून घसरलेली आर्थिक स्थिती रूळावर आणण्याचे आश्वास दिले होते.अफगाण आणि इराकमध्ये अमेरिकने लष्कारावर मोठ्याप्रमाणावर खर्च केल्याने देशाच्या तिजोरीवरील बोजा वाढला होता.त्याला आवर घालण्यासाठी ओबामांनी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु यास देशातील काही नागरिकांनी विरोध दर्शवला होता.तसेच २००८ साली आलेले आर्थिक संकटातुन अमेरिकेची अर्थव्यवस्था सावरली होती.परंतु गेल्याच महिन्यात स्ॅटडर्ट अॅण्ड पुअर या वित्तिय संस्थेने अमेरिकेचे मानांकन कमी केले.यामुळे जनतेच्या मनामध्ये ओबामांविषयी मोठ्याप्रमाणावर जनमत निर्माण झाले आहे.आणि याचीच प्रचिती त्यांना मतदानपूर्व चाचणीत दिसून येत आहे. मॅसॅच्युसेटसचे माजी गव्हर्नर असलेले रोमनी यांना ओबामापेक्षा दोन टक्के मते अधिक  मिळाली आहेत. ओबामा आणि मिट रॉमनी यांच्यासमवेत टेकसास राज्याचे गव्हर्नर रिक पेरी, मिशेल बॅचमन व रॉन पॉल यांनीही राष्ट*ाध्यक्षाच्या निवडणूकीत  सहभाग घेतला आहे.रोमनी हे रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार असून ओबामा यांचे कडवे प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.  

Leave a Comment