करिष्माचे ‘डेंजरस इश्क’ मधून पुनरागमन

मुंबई २२ ऑगस्ट –  विवाहनंतर पडद्याच्या आड गेलेली लोलो उर्फ करिष्मा कपूर तब्बल पाच वर्षानंतर पुनरागमन करत आहे.डेंजरस इश्कमध्ये ति एका सुपर मॉडेलच्या रूपात दिसणार असल्याचे ट्विट चित्रपटाचा दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी केले आहे. करिष्या या अगोदर २००६ साली मेरे जीवन साथी हा शेवटचा चित्रपट केला होता.त्यानंतर तिने दिल्लीतील व्यावसायिक संजय कपुर यांच्याबरोबर विवाह बंधनात बांधली गेली होती.दोन मुलांची आई असलेली  करिष्या थ्री डी चित्रपट असलेल्या डेंजरस इश्कमध्ये अॅक्शनपट भुमिकेत दिसणार आहे.आपल्या प्रियकाराची शत्रुच्या तावडीतुन सुटका करण्यासाठी एका महिलेला कराव्या लागलेल्या प्रत्यन या चित्रपटाचा गाभा आहे.

Leave a Comment