आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे आवश्यक-अॅड.बनसोडे

सोलापूर दि.२३ ऑगस्ट-आपण भारतीय असल्याचा खरीखुरी ओळख असलेले आधार कार्ड प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन सावरकर विचार मंचचे अध्यक्ष अॅड. शरद बनसोडे यांनी केले. सावरकर विचार मंचच्या वतीने शिवस्मारक येथील कार्यालयात आधार कार्ड   शिबिराला  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा प्रमुख दामोदर दरगड यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली, त्यावेळी अॅड. बनसोडे बोलत होते. यावेळी नगरसेवक बाबुभाई मेहता, वैभव सावंत, पाटील आदी उपस्थित होते.
केंद्र  सरकारने प्रत्येक नागरिकाला ओळख मिळावी म्हणून आधार कार्डची योजना सुरू केली आहे. प्रत्यक क्षेत्रात या कार्डची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे हे कार्ड प्रत्येकाने काढून घेणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात याचे काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे. प्रत्येकाने हे कार्ड काढून घेतले पाहिजे असेही अॅड. शरद बनसोडे यांनी सांगितले. तर सरकारची ही योजना घरोघरी पोहोचवण्याचे मोलाचे कार्य सावरकर विचार मंचच्या वतीने होत आहे. त्यात नागरिकांनी मोठा सहभाग घ्यावा, असे दामोदर दरगड यांनी सांगितले.
 राष्ट*ीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रमुख दामोदर दरगड यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागरिकांनी आपले आधार कार्ड काढण्यासाठी सावरकर विचार मंचच्या कार्यालयात दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यत येऊन सहकार्य करावे असे आवाहनही सावरकर विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment