
महाराष्ट्रच्या आर्थिक जीवनावर सध्या अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि कमी पाउस यांचा मोठा परिणाम झाला आहे. वास्तविक यावर्षी पाउस तसा कमी नाही पण सरकारच्या आकडेवारीप्रमाणे राज्यातील ३५५ पैकी १४५ तालुके दुष्काळग्रस्त झाले आहेत. यावर्षी पावसाने जूनमध्ये थोडी ओढ दिली पण तसा बरा पाउस पडला आहे. पश्चममहाराष्ट्रतील फक्त दोन धरणांचा अपवाद सोडला तर धरणे नव्वद टकके धरणे भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे जवळ जवळ एक महिना आधीच भरली आहेत. दरवर्षी जून महिन्यात दहा दिवसाचा जोराचा पाउस जो पडतो तो यंदा पडलाच नाही. पण पंधरा दिवसाचा मोठी ओढ सोडली तर रात्रंदिवस कायम झिमझिम सुरु आहे. हा पाउस मुरवणीचा असतो. त्यामुळे पूरपरिस्थिती फारशी नसते तरीही शेतीला पाणी पुरेसे मिळते. कोल्हापूर व सांगली जिल्हयात यावर्षीही चार पाच दिवसाचा पुराचा प्रसंगही येअून गेला. यावर्षी बारामतीत अतिशय गमतीदार स्थिती आहे. ती म्हणजे बारामतीला पंचवीस टीएमसी पाणी पुरवार्या भाटगर आणि वीर धरणांच्या परिसरात फक्त कमी पाउस झाला आहे. कोयना, धोम, वरसगाव, पानशेत, टेमघर, मुळशी, पवना ही सारी धरणे पंचाण्णव टक्के भरली आहेत. पण भाटघर धरण फक्त पंचावन्न टक्के भरले आहे. पश्चम महाराष्ट्रत शिवनेरी किल्ल्यापासून निघालेल्या रस्त्याने जर साडेतीनशे किमी दक्षिणेला कोल्हापूरपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून रपेट मारली तर दोन्ही बाजूला हिरवीगार शेती आहे.