नदीच्या दुषित पाण्याने हजारो लोक आजारी पडतात हाच मोठा भ्रष्टाचार-जलतज्ज्ञ राजेंद्र सिह

सोलापूर दि.२२ ऑगस्ट – नदीच्या पाण्यात कारखान्यातील दुषित पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जलसंकट निर्माण झाले आहे. देशातील पैशाचा भ्रष्टाचार महत्त्वाचा नसून नदीचे दूषित पाण्यामुळे अनेक लोक आजारी पडतात. त्यामुळे हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असे मत आंतरराष्ट्रिय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिह यांनी व्यक्त केले.
 गेल्या ६५ वर्षात नद्यांचे प्रश्न आणखीन सुटले नाहीत, ते सोडविण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे सरकारही  प्रश्नांकडे गांभीर्याने बघेल. पाण्याचे बाजारीकरण झाल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही. परंतु देशातील ८० टक्के नागरिकची तहान भागविणे अवघड होईल, अशी भीती जलतज्ज्ञ राजेंद्रसिह यांनी व्यक्त केली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापाच्या वेळी संघाच्या सभागृहात ते बोलत होते.जमिनीखालील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी नाले आणि  बंधारे बांधले पाहिजेत. तापमान कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करुन निसर्गाशी मैत्री करावी तसेच नद्यांचे प्रदूषण होऊ नये व नियंत्रित करण्यासाठी संघटन व कृती समितीची गरज आहे. त्यासाठी नितीनियम बनवून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे राजेंद्रसिह म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याला उजनीतून प्रदूषणयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी व पुढील गावांना समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून येत्या दोन दिवसात भीमा नदीच्या तिरावर केंदा्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिदे, पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासमवेत इतर पदाधिकारी व नदीच्या शेजारील गावातील राजकीय नेते, समाज व संतमंडळी यांच्यात बैठक होऊन प्रदूषण रोखण्यासाठी जागृती निर्माण केली जाईल असे राजेंद्रसिह म्हणाले.

Leave a Comment