मुंबई दि.२३ ऑगस्ट – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना संपूर्ण देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच काँग्रेसच्या एका मंत्र्याने मंगळवारी चक्क अण्णा हजारे यांच्यावरच टीका केली. घटना आणि महात्मा गांधी यांच्याशी इतरांनी तुलना करु नये. घटनेच्या चौकटीत राहूनच कायदा करायला हवा, अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी अण्णांची खिल्ली उडविली.
मंत्रालयात आपल्या दालनात पत्रकारांशी बोलताना राणे यांनी भ्रष्टाचार रोखण्यात काहीच गैर नाही मात्र हे आंदोलन संसदीय चौकटीत राहूनच केले पाहिजे. राज्यघटना आणि महात्मा गांधींपेक्षा आपण मोठे आहोत, हे कोणी दाखविण्याचा प्रयत्न करु नये, असे सांगितले. दरम्यान अण्णा हजारे यांच्या आंदोलनाविषयी बोलताना राष्ट*वादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, हजारे यांच्या आंदोलनाविषयी दिल्लीतील नेत्यांनी आधीच गोंधळ घालून ठेवला आहे. त्यात मी काही बोललो तर गोंधळ वाढायला नको. अण्णांच्या आंदोलनाबाबत मार्ग निघायला हवा. पण त्यासाठी घटनेत सुधारणा करायला हवी. घटना बदलायला नको.
1 thought on “उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उडविली अण्णा हजारेंची खिल्ली”
Leave a Comment
You must be logged in to post a comment.
Aaplya maharashtrach durbhagy ki narayan rane sarkha gund manus mantri padavar aahe. jo manus chembur madhe gundagardi kart hota , deshi daruche dukan chalvycha , tya mansala shivshene ne mukhyamantri kele , aasha gundanchya hatat apla maharashtra aahe he aaple durbhagya aahe. phakt narayan ranech nahi tar aashe 99%mantri sare chor, brashtrachari , khuni ,gund, chindichor aahet . aas vat te yasarvana chwokat ubhe karun golya khalavet .
AATA TI VEL LAMB NAHI YASARVANA YAMLOK LAVKARACH PATVIN
JAY MAHARASHTRA