राजीव गांधी ई-लर्निंग अॅकॅडमीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि. २१ ऑगस्ट – पुण्यात शिवदर्शन सहकारनगर परिसरात पुणे मनपाच्या माध्यमातून साकारलेल्या राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगचे नामकरण व उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, उल्हासदादा पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महापौर मोहनसिग राजपाल, खा. सुप्रिया सुळे, खा. आढळराव पाटील, खा. प्रकाश जावडेकर, पुण्यातील सर्व आमदार पुणे मनपाचे सर्व पक्षनेते, नगरसेवक, शिक्षणमंडळ पदाधिकारी, मनपा आयुक्त महेश पाठक, म्हाडाचे अध्यक्ष अॅड. अंकूश काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मराठीत प्रदीप भिडे आणि इंग्रजीत श्रीमती दुरिया शिपचँडलर हे करणार असल्याची माहिती या संकल्पनेचे जनक आणि पुणे मनपातील विरोधी पक्षनेते आबा बागूल यांनी दिली. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती घडवून मोठी क्रांती केली. गोरगरिबांची मुलेदेखील इंग्रजी व संगणक शिकून भविष्यात स्वतःच्या पायावर उभी रहावीत, हे राजीव गांधी यांचे स्वप्न होते. त्यासाठीच या शाळेचे नाव राजीव गांधी अॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग असे देण्यात आल्याचे आबा बागूल यांनी सांगितले. पुणे मनपाच्या या अॅकॅडमीत सध्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व सातवीपर्यंत माध्यमिक शिक्षण देण्यात येत असून विद्यार्थी संख्या ९०० इतकी आहे. एकूण क्षमता १५०० विद्यार्थ्यांची असून भविष्यात ही शाळा १२ वी पर्यंत होईल.
पुणे मनपातफर्े चालविली जाणारी ई-लर्निंग सीबीएससी सह दप्तरविना शाळा ही देशातील अशा प्रकारची पहिलीच शाळा असावी. सोमवार ते शुक्रवार स. ८ ते दु. ४ या वेळेत ही शाळा भरते. विद्यार्थ्यांना सकाळी दूध, सुटीत नाष्टा व दुपारचे पौष्टिक भोजन विनामूल्य देण्यात येते. या पाचमजली वास्तूत ३१ वर्गखोल्या असून सुमारे २०० संगणक, प्रत्येक वर्गात एलसीडी, कॉम्प्युटर लायब्ररी, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशस्त कँटीन आदी सुविधा आहेत. शाळेतील मुला-मुलींचे पालक अल्प उत्पन्न गटातील असून या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्राथमिक इंग्रजी यावे व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबाबत जागरुकता यावी, यासाठी दर सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायं. ६.३० ते ८ या वेळेत पालकांची शाळा आयोजित केली जाते. शाळेतील शिक्षिकांबरोबरच अनेक समाजसेवी शिक्षकही यात सहभागी झाले आहेत. पालकांचा याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे मनपाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षिकांसाठी ट*ेनिग सेंटरही सुरु होणार असून भविष्यात युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परिक्षांचे वर्गही पुणे मनपातफर्े घेण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Comment