यावर्षी गणेश मंडळ देखाव्यांमध्ये अण्णा लोकप्रिय

पुणे -अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने गणेश मंडळांवरही कब्जा मिळविला असून यंदा पुण्यातील अनेक गणेशमंडळे हाच देखावा सादर करणार आहेत. अण्णा, रामदेव बाबा, किरण बेदी यांच्या पुतळ्यांना या मंडळांकडून मोठी मागणी असून ही मागणी पुरी करण्यासाठी शिल्पकार व कलाकार रात्रीचा दिवस करत आहेत.कसबा पेठेतील शिल्पकार सतीश ताऊ सांगतात की त्यांनी अण्णा व रामदेव बाबा यांचे पूर्णाकृती पुतळे यापूर्वीच तयार केले असून आत्ता दहा मंडळांनी अण्णांच्या पुतळ्यासाठी मागणी नोंदविली आहे. आणखी पाच पुतळ्याची मागणी येण्याचीही शक्यता आहे.
औंध गावातील वैभव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणाले की यावर्षी आम्ही लोकपाल बिल हाच देखावा सादर करणार आहेात. आत्ताच्या वातावरणात यासारखा दुसरा योग्य विषयच नाही. यावर्षी एकंदरीतच खूप घोटाळे बाहेर आले आहेत. लोकपाल आंदोलन नंतर आले असले तरी या घोटाळ्यांवर लोकपाल बिल हेच उत्तर असल्याने तोच विषय आम्ही निवडला आहे.अन्य एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले की बर्‍याच वर्षांनी देशात अशी चळवळ सुरू झाली आहे की ज्यात सर्वसामान्य नागरिकापासून अगदी श्रीमंत वर्गातील व सर्व क्षेत्रातील नागरिक सामील झाले आहेत. लोकपाल बिलाविषयीचा देखावा १० दिवस सादर करून आम्हीही या आंदोलनाला पाठिबा देत आहोत तसेच लोकपाल बिलाबाबत जनजागरण करण्याचा उद्देशही पुरा करत आहोत
रामदेवबाबांच्या भारत स्वाभिमान ट्रस्ट पुणे शाखेच्या कार्यकर्त्यांही अनेक मंडळांशी संफ साधला असून मंडळांना अण्णा व रामदेवबाबांची चित्रे पुरविली आहेत. त्याद्वारे सामाजिक संदेश पसरवावा अशी विनंतीही त्यांनी या मंडळांना केली असल्याचे समजते.शनिवार पेठेतील अजंठा मित्र मंडळाचे विजय मरळ म्हणाले की आम्ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचाच विषय सजावटीसाठी घेतला असून त्यासाठी साठ हजार रूपये खर्च करतो आहेात. त्यात अण्णांबरोबरच किरण बेदी, अरविद केजरीवाल यांचे पुतळेही मांडण्यात येणार आहेत.

Leave a Comment