कराचीत रक्तपात

पाकिस्तानातली मुंबई असे ज्या शहराला म्हटले जाते त्या कराची शहरात गेल्या सहा महिन्यांपासून जो जबरदस्त रक्तपात सुरू आहे तो मनाला आचंबित करणारा आणि अस्वस्थही करणारा आहे. आज तिथे झालेल्या दोन गटातल्या संघर्षात ५२ लोक मारले गले. काल ४२ जणांच्या हत्या झाल्या होत्या. पाकिस्तानात दररोज कोठे ना कोठे स्फोट होत आहेत आणि रोजच पाच पंचवीस लोक मारले जात आहेत. तसा प्रकार भारतात १९८० च्या दशकात पंजाबात सुरू होता.  सध्या अफगाणिस्तानातही हिसाचार हा नित्याचार झाला आहे  आणि अनेक लोक मारले जात आहेत पण या सगळ्या प्रकारात आणि कराचीत आज सुरू असलेल्या हाणामार्‍यांत फार मोठा फरक आहे. इतरत्र सुरू असलेले प्रकार छुपेपणाने केलेल्या  बाँबस्फोटाचे आहेत. ते साधारणतः गर्दीच्या ठिकाणी केले जातात. निष्पाप लोक मरतात पण त्या बळींना नेमकेपणाने लक्ष्य केलेले नसते. स्फोट घडवणार्‍या अतिरेक्यांना आपल्या अतिरेकी कृत्यातून नेमके कोण मरणार आहेत हे माहीत नसते. पण कराचीत दोन भिन्न गटांत निश्चित स्वरूपात काही लोकांना तसेच काही विशिष्ट वंशाच्या लोकांना लक्ष्य करून ठरवून मारले जात आहे. तेही स्फटाने नव्हे तर सरळ सरळ तलवारी आणि शस्त्रांचा वापर करून मारले जात आहे.   
    कराची हे सिध प्रांतातले शहर आहेच पण ते पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणवले जाते. भारताची फाळणी झाली तेव्हा भारतातून पाकिस्तानात गेलेले मुस्लिम लोक सिध प्रांतात कराची आणि हैदराबाद या दोन शहरांत गेले. हे लोक उर्दु भाषिक आहेत. ते स्वतःला राष्ट* निर्माते म्हणवत असतात. पाकिस्तानच्या निमिॅतीचा इतिहास मोठा विचित्र आहे. पाकिस्तान निर्माण व्हावे या मागणीसाठी झालेला लढा आजच्या भारतात असलेल्या उत्तर प्रदेशातल्या मुस्लिमांनी लढवला होता. पाकिस्तान म्हणून जो भूभाग देण्यात आला त्या भूभागातल्या म्हणजे आजच्या पाकिस्तान मध्ये समाविष्ट असलेल्या भागात राहणार्‍या लोकांनी या लढ्यात फार हिरीरीने भाग घेतला नव्हता. ज्यांनी हा लढा दिला ते भारतीय मुस्लिम पाकिस्तानात कराचीत स्थलांतरित झाले. ते स्वतःला कौमी मूव्हमेंट या नावाने जाहीर करतात. पाकिस्तान आपण निर्माण केलाय असे त्यांचे म्हणणे असते.
    हे कथित देश निर्माते कराची आणि हैदराबादेत केन्द्रित झालेले आहेत. तिथे त्यांचा एमक्यूएम हा पक्ष आहे. आणि या दोन शहरांतून त्यांचे काही आमदार आणि खासदार निवडून येत असतात. त्यांची या दोन शहरांत प्रचंड गुंडगिरी आहे. त्यांनी पूर्वीही अनेकदा तिथे दंगली पेटवलेल्या आहेत.  आता त्यांचे वर्चस्व कमी होत आहे म्हणून ते धास्तावले आहेत आणि हिंसाचार करायला लागले आहेत. या दोन शहरांत हे उर्दु भाषिक लोक ५२ टक्के आहेत. त्याच्या जोरावर ते राजकारण करीत आले आहेत. पण आता त्यांचे हे वर्चस्व कमी होत आहे. कारण एकतर ही दोन शहरे सिध प्रांतात असल्याने  सिध प्रांतातले ग्रामीण भागातले सिधी भाषिक लोक या शहरांत पोटापाण्यासाठी स्थलांतर करायला लागले आहेत. त्यामुळे एक कोटी ७० लाख लोकसंख्येच्या या शहरांत सिधी भाषकांचे प्रमाण ११ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर गेले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमा प्रांतातले आदिवासी, पठाण आणि अन्य काही लोकही तिथल्या दहशतवादी कारवायना कंटाळून कराचीत येत आहेत. आजवर त्यांचे तिथले प्रमाण ३ टक्के होते. ते आता ८ टक्क्यांवर गेले आहे. उर्दु भाषकांचे प्रमाण ५२ टक्क्यांवरून  ४६ टक्क्यांवर आले आहे. त्याचे परिणाम होत आहेत. गेल्या निवडणुकीत एमक्यूएमच्या बालेकिल्ल्यात काही आमदार पडले. त्यामुळे हे लोक धास्तावले आहेत आणि उघडउघडपणे अन्य भाषकांचे भर रस्त्यात मुडदे पाडत सुटले आहेत.
    या सगळ्या घटनांना आणखी एक बाजू आहे. एमक्यु एम या पक्षाची गुंडगिरी वाढली आहे. तसा हा पक्ष एकंदर राजकारणात नगण्य होता. त्यामुळे त्यांनी गुंडगिरी केली की  त्यांना अटक करून बिनदिक्कतपणे तुरुंगात टाकले जात असे.  असे एमक्यूएम पक्षाचे अनेक गुंड गजाआड होते पण १९९० नंतर पाकिस्तानात राजकारणाचे रंग बदलले. आघाडी सरकारांचे युग सुरू झाले. अशा राजकारणात लहान सहान पक्षांनाही महत्त्व येते तसे ते एमक्यूएमलाही आले. त्यांचा पक्ष लहान असला तरी त्यांच पाठींबा निर्णायक ठरायला लागला.  मग बेनझीर भुट्टो आणि नवाज शरीफ यांनी त्यांची मदत घेतली आणि त्या बदल्यात एमक्यूएमच्या अनेक गुंडांना तुरुंगातून  सोडले. या लोकांनी बाहेर पडताच आधी पोलीस अधिकार्‍यांवर हल्ले सुरू केले. अनेक पोलिसांच्या हत्या झाल्या पण एमक्यूएम  च्या अशा खुनी कार्यकर्त्यांवर कसलीही कारवाई होत नसे कारण त्यांच्या पाठिंब्यावर सरकारचे स्थैर्य अवलंबून असे. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक तसेच त्रस्त व्यापारी या एमक्यूएमच्या कार्यकर्त्यांचा सूड घेण्यास टपलेलेच होते. आता एमक्यूएमला सरकारचे संरक्षण नाही म्हणून आता हे लोक एमक्यूएमच्या लोकांचा सूड घेत आहेत. 
    एमक्यूएमचे कार्यकर्ते पख्तून लोकांवरही हल्ले करीत आहेत. पण त्याचा बदला घेण्यासाठी जेव्हा पख्तुन लोक एमक्यू एमच्या कार्यकर्त्यांवर प्रतिहल्ले करतात तेव्हा पोलीस चक्क  प्रेक्षकाची भूमिका घेतात आणि वेळ पडल्यास एमक्यूएम कार्य कर्त्यांच्या हत्या करण्यास पख्तून लोकांना मदतही करतात. अशा रितीने निरनिराळ्या वंशांचे लोक परस्परांवर दिवसा हल्ले करीत आहेत. अशा प्रकारच्या हल्ल्यात कराची शहरात गेल्या सहा महिन्यात तीन हजारावर लोक मारले गेले आहेत.या सार्‍या गोंधळाम काही गुन्हेगारी टोळ्याही आपले हात साफ करून घेत आहेत. कराचीत आज कोण कोणाला मारत आहे याचा काही पत्ता लागत नाही. यादवी माजली आहे.
निीट हाताळता आले

Leave a Comment