अण्णांचे राळेगण सिद्धी-एकविसाव्या शतकातील सेवाग्राम

गेली बत्तीस वर्षे ज्या गावाने संपूर्ण व्यसन मुक्ती, शेतीत पाणी अडवा पाणी जिरवा, चराईबंदी, झाडावर कुर्‍हाडबंदी असे उपक्रम राबविले आहेत त्यातून शंभरपेक्षा अधिक गांवांचे असे प्रशिक्षण केले आहे आणि ज्यांचा दिवसच हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा यांच्या वाचनानी  सुरु होतो ते अण्णा हजारे यांचे राळेगण सिद्धी हे नगरजिल्ह्यातील गाव सध्या आंदोलनामुळे एका बाजूला देशातील सर्वांचे आकर्षण केंद्र बनले आहे तर दुसर्‍या बाजूला नगर जिल्हा, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा येथील नागरिकांचे तीर्थक्षेत्र बनले आहे. ज्याला जमेल त्याला एक वेळ , एक दिवस दोन दिवस असा उपास करणे आणि राळेगण सिद्धीला पायी वारी समजून जाअून येणे अवघ्या सव्वादोन हजार लोकसंख्या असणार्‍या राळेगणमध्ये सध्या तरी बाहेरहून आलेले दररोज सव्वादोन हजार अन्य ग्रामस्थ राळेगण बघण्यास आलेले असतात. सध्या सारे राळगण तिहार जेलचा भाग झाले आहे कारण ‘आपले अण्णा’ तेथे उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी सकाळी अण्णा आणि सारे सहकारी रामलीलामैदानापर्यंत पायी जाणार आहेत.म्हणे सारी दिल्ली लोटणार आहे. तर सारे राळेगण गावाची पायी वारी करणार आहे.
    बत्तीस वर्षापूर्वी जेंव्हा सेनेतील सेवा संपवून अण्णा येथे आले तेंव्हा गावाची लोकसंख्या दोन हजार होती. गावात एकच जोरात चालणारा व्यवसाय होता तो म्हणजे ४२ हातभट्ट्या. राळेगणला जवळचे शहर म्हणजे पुणे जिल्ह्यातील शिरूर. शिरूरला ऐतिहासिक महत्व बरेच आहे पण गेली पन्नास वर्षे शिरुर ही महाराष्ट*ाची जर्दा आंण गुटका यांची राजधानी. येथून राज्याबाहेरही माल जातो. त्या व्यापार्‍यांना जाताना राळेगणची पहिल्या धारेची हातभट्टी स्वतात मिळायची. परगावी तयार माल पाठवण्यासाठी मोटारीच्या चाकाच्या ट्यूबमध्ये भरलेली पार्सल्स तयार शिरूर पोहोच होत, त्यामुळे बेचाळीस लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायचा पण बाकींच्या प्रथम फुकट, नंतर उधार आणि नंतर भक्क्म किमतीने प्रत्येक गावी दारू आणि गुटका हेच पुरुषार्थाचे लक्षण मानले जायचे. गावाची सव्वादोन हजार एकर जमीन तशी कोरडवाहू पण अनेकानीआपल जमीन शिरुरच्या आणि पारनेरच्या सावकाराकडे गहाण ठेवलली असायची.
    आज अण्णांनी दिल्लीला उपोषण सुरु केले आहे. देशातील कोटी कोटी जनता ‘मी अण्णा हजारे ’ असे अभिमानाने मिरवत आहे. गांधी टोपीला पुन्हा प्रतिष्ठेचे दिवस आले आहेत. पस्तीस वर्षापूवीं अण्णा लष्करी सेवेतून निवृत्त होउन आले तेंव्हा ही गावची स्थिती बघून आपण काही करू शकतो असे वाटले व त्यासाठी घरी मुक्काम न नेता गावच्या पडक्या मंदिरात मुक्काम नेला.तो आजही तेथेच आहे. ते मंदीर आता राष्ट*ीय कुटीर झाले आहे. १९६५च्या पाकिस्तानविरोधातील युद्धात त्यांच्या वाहनावर बॉम्बशेल पडला आणि ते सोडून सारे मरण पावले. त्याचा त्यांना येवढा त्रास झाला की, त्यांची पावले आत्महत्येच्या दिशेने निघाली. सहज जाता जाता रस्त्याच्या कडेला जुनी पुस्तके विकणार्‍याकडे एक दुमडून पडलेलेस्वामी विवेकानंद यांचे एक पुस्तक दिसले. उत्कंठेपोटी त्यंानी उचलले. त्यात गीतेचा संदेश होता. मिळालेले जीवन हे लोकोपयोगासाठी आहे. तुझा धीर कसा खचतो. तुझ्यात असामान्य सामार्थ्य आहे. असा वाक्य वाचायला मिळाले. राणेगणला जाण्यापूर्वी ते प्रथम आळंदीला गेले. तेथे एकच गोष्ट मिळाली ती म्हणजे स्वामीजींचे ते वाक्य खरे आहे असे वाटू लागले.
    आज देशात भ्रष्टाचार हटविण्याच्या मंत्राचे नाव  ‘अण्णा हजारे’ झाले आहे. पन्नास वर्षापूर्वी ग.दि.माडगूळकर यांनी चीनयुद्धाच्या वेळी ‘लढतील सैनिक लढू नागरीक , लढतील महिला लढतील बालक. अशा आशयाचे गीत लिहिले होते. त्याची प्रचीती आज वाहिन्यावरील आबालवृद्धांच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर येते. अण्णा हजारे या शब्दांना मंत्राचे सामर्थ्य येण्याची गंगोत्री पस्तीस वर्षापूवीं आळंदीतून सुरु झाली. काही तरुण मित्रांच्या मदतीने तेंव्हा त्यांनी प्रथम गावातील ४२ हातभट्ट्या स्वतः मोडून काढल्या. घरच्यांनी जनरीतीप्रमाणे त्यांच्या विवाहाचा घाट घाटला पण अण्णांनी तो मोडून काढला. मुक्काम घरी आणलाच नाही. आणि बाहेरगावहून दारु पिअून येणार्‍याला त्याच्या घरच्या लोकांच्या समोर फटक्यांची शिक्षा दिली.
    हळूहळू प्रत्येक व्यसनी व्यक्तीला अण्णांचा प्रसाद मिळू लागला आणि गावात बदल होअू लागला. त्यामुळे प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढू लागला. गावच्या ओढ्याला तीन ठिकाणी बंधारे घालण्याचे काम प्रथम एकट्याने सुरु केले आणि हळूहळू व्यसने सुटलेले त्यांच्या मदतीला आले.अवघ्या दहा वर्षात गावातील प्रत्येक जमिनीला पुरेसे पाणी मिळू लागले. नशाबंदीसमोर नसबंदीही लोकंाना पटू लागली. गावातील गायरानातील गवतही गुरे चारली नाहीत तर अनेक पटींनी गवत मिळते याची प्रचीती आली आणि गावात चराईबंदी झाली. गावातील कोणतेही झाड न पाडण्याचा संकल्प करून गावकर्‍यंानीच कुर्‍हाडबंदी केली. अशा पद्धतीने अवघ्या दहा वर्षात आदर्श गाव कसा उभारायचा याची संहिता उभी राहिली.
    गेले दोन दिवस अण्णांच्या उपोषणाचा मुक्काम तिहार जेलमध्ये आहे. उपोषणाच्या आधारे भ्रष्टाचाराविरोधातील जिकता येते याची खात्री देशातील सामान्य माणसाला वाटू लागली आहे. पण सार्‍या जगाला याचे आश्चर्य वाटत आहे. आजची जगातील न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिग्टन पोस्ट, ब्रिटनमधील मँन्चेस्टर गार्डियन, रशियातील प्रवदा, चीनमधील पीपल्स डेली, फार्मोसामधील चायना पोस्ट, मलेशियातील द स्टार, पाकिस्तानमधील डॉन या दैनिकांनी पहिल्या पानावर कोणी अण्णांचे चित्र तर कोणी तिहार जेलचे चित्र कोणी राणेगणसिद्धीचे चित्र तर कोणी आळंदीत केलेल्या पंधरावर्षापूवींच्या पहिल्या भ्रष्टाचार निर्मूलन उपोषणाचे चित्र दिले आहे. पण पंचवीस वर्षापूर्वीच अण्णांचे राळेगण हे स्वयंपूर्ण ग्राम तर झालेच पण तेथील माणूसही येवढा बदलला की, ते आदर्शंग्राम आदर्श सेवाग्राम झाले.
    अण्णा हा असा समाजसेवक आहे की, तेथे फक्त एकमार्गी लोकसेवा नाही तर आंदोलनासाठी कठोरात कठोर होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ज्याना महात्मा गांधी यांची भाषा कळणार नाही त्यांना शिवाजी महाराज यांची भाषा कशी समजावून सांगायची याची खुबी त्यांच्याजवळ आहे. राळेगणमधील ४२ हातभट्ट्या त्यांनी कसा उध्वस्त केल्या आणि पंचक्रोशीतील व्यसनी लोकांना परत मार्गावर कसे आणले हे स्थानिक लोकांना माहीत आहे. १९९०अण्णा हे फक्त याच भागातील रचनात्मक कार्यकर्ते वाटायचे पण १९९०मध्ये त्यांनी प्रथम राज्यसरकारमधील भ्रष्टाचार काढायला आरंभ केला. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी भारतीयांच्या स्वीस बँकेतील चारशे लक्ष कोटी रुपये काळ्यापैशाचा उल्लेख केला आहे. जगातील अनेक सरकारंानी स्वीस बँकेतील आपापला पैसा नेला पण सर्वात मोठी रक्कम असलेल्या भारतातील सरकारच तो पैसा ठराव करून नेण्यास तयार नाही पण हा गांधीयन फकीर ते काम करण्यास उभा राहिला आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे भारतीय लोकांना त्याची खात्री पटू लागली म्हणून कोटीच्या कोटी भारतीय लहान मुले आणि तरुणही डोक्यावर ‘आय अॅम अण्णा’ अशी प्लॅकार्ड मिरवत हिडत आहे.आणि तेथील सरकारेही हतबल झालेली आहेत. हा लढा यशस्वी झाला तर जगात अनेक ठिकाणी हा लढा पसरण्याची शक्यता आहे.
– मोरेश्वर जोशी,पुणे

Leave a Comment