पुण्यात हजारों अण्णा समर्थक रस्त्यावर उतरले

पुणे – अण्णा हजारेंच्या उपोषणाला  सक्रिय  पाठिबा देण्यासाठी आज सलग दुसर्‍या दिवशीही शहरातील  हजारों अण्णा समर्थक रस्त्यावर उतरले होते. बालगंधर्व चौक आणि अलका  चौकात झालेल्या निदर्शनात ङ्खहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. सोशल नेटवर्कींग साईट्सवरही आज अण्णांच्या आंदोलनाविषयीच्या कङ्खेंटस् दिसून आल्या.
 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यातीने आज बालगंधर्व चौकात देशातील भ्रष्टाचारी नेत्यांची पोस्टर्स जाळली आणि उद्या संपुर्ण देशात ङ्खहाविद्यालये बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने अण्णांना जेलमध्ये टाकून भ्रष्टाचाराविरोधातील हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असून  आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे.  सरकारला  त्यांनी केलेल्या चुकाचे  परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निरोधक समितीने दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्य वतीन सरकारचा निषेध करण्यात आला आहे. एशींच्या दशकात ज्याप्रङ्खणे जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्ङ्खाण  आंदोलनात संघाने सक्रिय सहभग घेतला होता, त्याचप्रङ्खाणे अण्णांच्या आंदोलनात संघ सहभागी होणार आहे संघाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय आणि व्हीआयटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी जोरदार  घोषणाबाजी करत संपूर्ण  परिसर दणाणून सोडला होता. ‘अभी नहीं तो कभी नहीं,’ ‘एकच ताल जनलोकपाल’ अशा घोषणा देत युवक अण्णा हजारे यांना पाठिबा दर्शवत होते, देशभक्तीपर गाणी तसेच हतात तिरंगा घेतलेले अनेक तरुण कार्यकर्ते  हजारे यांना पाठिबा देत होते.
 इंडिया अगेन्स्ट करप्शन, शिक्षक हक्क मंच, कोकणवासीय महासंघ, क्रिएटिव्ह फाउंडेशन, छावा विद्यार्थी संघटना,  मानवाधिकार संघटना, राष्ट्रसेवा दल, अधिवक्ता परिषद, भ्रष्टाचार आणि अत्याचार विरोधी समिती, शिवसेना ङ्खहिला आघाडी, अचार्य विनोबा लोकसेवक संघ, चाणाक्या ङ्खंडल परिवार, भाजप व्यापारी आघाडी आदी संघटनांनी आज अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिबा दर्शवला आहे.

Leave a Comment