
यवतमाळ दि.१८ ऑगस्ट – अण्णा हजारे आणि त्यांचा चमू अत्यंत धूर्त असून त्यांना आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण करून ती लादण्यास बाध्य करायचे आहे. त्यांचे आंदोलन पूर्णतः लोकशाहीची, संसदीय शासन व्यवस्थेची व घटनेची थट्टा असून हतबल झालेल्या केंद्र सरकारने कठोर निर्णय घेऊन सरकार म्हणून जे जे कर्तव्य पार पाडायचे आहे ते पार पाडलेच पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार, विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी येथे केले.
शासकीय विश्राम भवनात आयोजित वार्ताहर परिषदेत धोटे यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनावर जोरदार टीका केली. अण्णा हजारे स्वतः भ्रष्टाचारापासून मुक्त नसल्याने त्यांना भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा हक्कच नाही, असा स्पष्ट आरोप धोटे यांनी केला. धोटे म्हणाले की, हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचार्यांचे, असंतुष्टांचे व सहकारी नोकरीत असताना अहंकार पोसले गेले नाही, अशा अधिकारी कर्मचार्यांचे कडबोळे जमा झाले आहे. मी म्हणेन तेच झाले पाहिजे, हा हजारेंचा अहंकार आणि विचारांना तिलांजली देऊन भावनेच्या भरात अण्णांना पाठिबा देणार्या तथाकथित बुद्धीवाद्यांना हे समजायला हवे की, अशा लोकांच्या पाठीशी उभे राहून आपण स्वतःच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत.
धोटे कडुन काय अपेक्शा असनार