
नागपूर दि.१७ ऑगस्ट – राजकारणाने सर्वच क्षेत्रांचा ताबा घेतला आहे. त्याने खेळांनाही सोडले नाही. क्रिकेट, फूटबॉल, हॉकी अशा सर्व खेळात राजकारण शिरल्यामुळे गुणवत्ता, होतकरू असलेले खेळाडू मागे पडत आहेत. राजकारणाने सर्वच खेळांना नासविल्याचे ध्यानात आल्यामुळे स्टॅण्डबाय हा चित्रपट काढला आहे, असे उद्गार सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक संजय सुरकर यांनी काढले. चौकट राजा, रावसाहेब, तू तिथे मी, घराबाहेर अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शक व चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे नागपूरचे भूषण असलेले संजय सुरकर यांचा स्टॅण्डबाय हा हिदी चित्रपट येत्या २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.