उपोषण सुरु होण्या अगोदरच अण्णांना अटक

नवी दिल्ली – लोकपाल विधेयकासाठी आमरण उपोषणाची घोषणा केलेल्या अण्णा हजारे यांना दि १६ ऑगस्ट मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. आज सकाळी सध्या पोशखातील पोलिसांनी अण्णांना सर्वोच्च न्यायालयाचे वकील शांती भूषण यांच्या घरून ताब्यात घेतले.७४ वर्षीय अण्णा आज लोकपाल विधेयकासाठी आपले दुसरे उपोषण सुरु करणार होते त्याआधीच त्यांना स्थानबध्द करण्यात आले.

” प्रिय देशवासी,दुसऱ्या स्वातंत्र लढयाला सुरुवात झाली आहे आणि मला अटक करण्यात आली.परंतु माझ्या अटकेने हा लढा सरकारला थांबवता येणार का? बिलकुल नाही.तुम्ही हा लढा चालूच ठेवा ” हे अटकपूर्वीचे अण्णांचे उदगार ..

अण्णा हजारे यांच्याबरोबरच किरण बेदी ,अरविंद केजरीवाल आणि मनीश सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment