अण्णांच्या अटकेविरूद्ध पुण्यात संतप्त नागरिकांचे निदर्शने

अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालचे भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन पाहिल्यावर साठीच्या लोकांना आणिबाणीतील आंदोलनाची आठवण होत होती तर ऐंशी पार केलेल्यांना स्वातंत्र्याच्या आंदोलनाची आठवण येत होती. एक गोष्ट खरी की, या वेळी लोकांचा प्रतिसाद हा अभूतपूर्व होता. कामगारसंघटना, शिक्षक संघटना, वकील संघटना, विद्यार्थीसंघटना, महिला संघटना व महिला मंडळे. राजकीय विचाराच्या डाव्या विचाराच्या मध्यविचाराच्या आणि सांस्कृतिक संघटनाही आंदोलनात उत्स्फूर्त पडत असल्याचे चित्र दिसत होते. पुण्यात आज महापालिका, बांलगंधर्वचौक, मंडई, शनिवार अलका चौक या ठिकाणी आज निदर्शने अणि मोर्चे आणि मेळावे यांचे राज्य होते. त्यातील काही छायाचित्रे