राष्ट्रकुलक्रीडा स्पर्धेतील स्वतंत्र क्रीडाप्रकार भ्रष्टाचारातही नवा उच्चांक करणारे कलमाडी

सुरेश कलमाडी यांनी भ्रष्टाचाराचे एक भयंकर उदाहरण निर्माण केले असे असले तरी या प्रकाराचे अजून दोन पैलू आहेत हे विसरून चालणार नाही ते म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रात यापूर्वी गेल्या साठ वर्षात भारताने कधीही नव्हे येवढी पदके मिळवणे सुरु केले पण देशाला लाजिरवाणा वाटणारा जागतिक पैलू म्हणजे राष्ट्रकुलमधील ७२देशातील सर्वात भ्रष्टाचारी देश अशी भारताची जगभर संभावना झाली. वास्तविक दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या जोखडाखाली राहिलेल्या या देशांनी गुलामगिरीची शेवटची चिन्हे हटविण्यासाठी अधिक संघटित होण्यासाठी राष्ट्रकुल या संघटनेचा उपयोग करून घ्यायला हवा होता त्याऐवजी ब्रिटिशांचे उघारून दिलेले जोखड परत मानगुटीवर बसवून घेण्यासाठीच त्याचा ब्रिटिशांना उपयोग हेात आहे.
    पुण्यात तीन वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल युवाक्रीडास्पर्धेच्या हिशोबावर  (बेहिशोबावर )केंद्रीय महालेखापालांनी केलेली टिपणी या आठवड्यात पुढे आल्याने कलमाडीकृत आश्चर्याचे अजून एक दालन प्रकाशात आले आहे. राष्ट्रकुल संघटना आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा यांच्या माध्यमातून जगातील पन्नासपेक्षा अधिक देशावर साम्राज्य केलेल्या ब्रिटनने जे फसवाफसवीचे कौशल्य दाखवले ते कौशल्य पुण्यातून संसदेवर निवडून गेलेल्या सुरेश कलमाडी यांनी पुण्यात आणि दिल्लीत दाखवले. दिल्लीतील कॉमनवेल्थगेम म्हणजे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेमध्ये कलमाडी यांच्या खर्चाच्या वाटेला सोळाशे कोटी आले त्यातील त्यांनी शंभर कोटी खर्च व पंधराशे कोटी वरखर्च असा प्रकार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात २००८मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवाक्रीडास्पर्धेतही कलमाडी महोदयांनी खर्च व वरखर्च यांचे प्रमाण तसेच ठेवले . येथे फक्त आकडे निराळे आहेत.
    आता केंद्रीय महालेखापाल म्हणजे कॅग यांच्या अहवालात हाच ठपका ठेवला आहे.  वास्तविक गेल्या वर्षी राज्यसरकारने हिशोब तपासण्याची धमकी दिल्यावर हा हिशोब बाहेर येईल असे वाटले होते पण ती धमकी फक्त लवासाचा हिशोब बाहेर काढण्याच्या त्यांच्या धमकीतून पुढे आली होती त्यामुळे धमक्यांची परस्पर फिटांफिट झाल्याने स्थानिक राजकारणातील  छोटे राजन, बडे राजन अशा सार्‍यंाचीच झाकली मूठ राहिली. अर्थात क्रिकेटपासून ते ऑलिंपिकर्यंत क्रीडास्पर्धा या या मंडळींच्या  कलिक्युलर अॅक्टिव्हिटीमध्ये मोडणार्‍या आहेत.राजकारण हा त्यांचा करिक्युलर अॅक्टिव्हिटीचा विषय.तेथेही कोणाचे लक्ष लेकसिटीवर तर कोणाचे सिटीलेकवर.एकाचे बीआरटी जमते आहे हे पाहिल्यावर दुसर्‍यांने मेट्रो शहरातील करदात्यांना एक लाख कोटी रुपये खर्चात टाकणारे प्रकरण पुढे आणले.महालेखापलांनी पुण्यातील प्रकरणासाठी एक स्वतंत्र प्रकरण लिहीले आहे. ते २७ क्रमांकाचे व २२ पानाचे आहे. अलिबाबाच्या गुहेत जसा प्रत्येक क्षण उत्कंठेचा असायचा तसाच काहीसा प्रकार या अहवालाचा आहे.
     यातील सर्वात मोठे प्रकरण हे हॉटेलचे आहे. या हॉटेलसाठी तेथील गावाच्या शाळेसाठी आणि अन्य सार्वजनिक कामासाठी राखून ठेवलेली सहा एकर चार गुंठे जागा हॉटेलसाठी दिली ही तेथील ग्रामस्थांना जिव्हारी लागलेली बाब आहे पण त्यात केवळ कलमाडी दोषी आहेत असे नव्हे. ही जागा प्रथम होस्टेलसाठी निश्चत केली. त्याच्यावरील बांधकाम वेळीच पूर्ण झाल नाही म्हणून आयत्या वेळी सार्‍यांची सोय हॉटेलमधून केली आणि कोण कोठे राहिला यावर काहीही नियंत्रण न राहिल्याने सारा सारे काही बेबंदशाहीसारखे झाले. पण नंतर ती मुंबईच्या युनिटी इन्फ्रा कंपनीला साठ वर्षाच्या कराराने दिली. महालेखापालांनी एकूण ६३ प्रकरणे तपासली आहेत. त्यावेळी वापरासाठी आलेले चार फिरते कॅमेरे, ३७ स्पीड कॅमेरे, ५५ स्थिर कॅमेरे, १४ इनडोअर कॅमेरे, ४ सीसीडी कॅमेरे हे तपासाच्या वेळेपर्यंत धूळ खात पडले होते. यामध्ये सर्वात महत्वाचा असा मुद्दा उपस्थित झाला आहे की, ज्या स्टेडियमचे बांधकाम दहा वर्षापूर्वीच झाले आहे तेथे पुन्हा एकशे साठ कोटीचे बांधकाम करण्याची गरज काय होती. यात शिकर्े कंपनीने ज्या कामासाठी प्रथम २६३ कोटी कोट केले तेच काम नंतर १९१ कोटीत झाले व संयोजन समितीने त्यांच्याकडूनच अजून वीस कोटीची खरेदी केली. तीही महाग दराने. वस्तूंच्या किमती अनेक पटींनी लावण्याचे कसब कलमाडींनी येथेच आत्मसात केले. राष्ट*कुल युवाक्रीडा स्पर्धेसाठी सुरु झालेले बाणेर रोड आणि सूसरोड यांचे काम अजून पूर्ण झालेले नाही. 
कलमाडी यांच्यावरील आरोपाच्या दोन बाजू लक्षात घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे ते अटकेत असताना त्यांच्यावर लिहिणे योग्य नव्हे कारण त्यांची बाजू मांडण्याची संधी त्याना मिळाल्याखेरीज आपल्या लेखनातून न्याय भूमिका घेतली असे होणार नाही. पण जे आरोप सीबीआय आणि कॅगने ठेवले आहेत त्यावर लिहायला हरकत नाही म्हणून त्यावर लिहिले आहे. तरीही एक बाजू उरतेच. ती म्हणजे गेली अनेक दशके क्रीडा क्षेत्रात आपले क्रिडापटू जगात फारसे चमकताना दिसत नाहीत. पण युवा स्पर्धा आणि राष्ट्रकुलस्पर्धा यानंतर तालिका आकडे बदलले आहेत. ते शंभरच्या पुढे गेले आहेत. ही फार मोठी जमेची बाजू असली तरी कॅग आणि सीबीआयकडून जे भ्रष्टाचाराचे गंभीर आहेत. यातील अजून एक बाजू अशी की, अशोक चव्हाण आणि कलमाडी ही राजकारणात फारसा पाठिबा नसलेली मंडळी आहेत कारण यापेक्षाही गंभीर आरोप असलेली मंडळी केवळ भक्कम राजकीय पाठिब्यामुळे त्यांना कोणी हात लावू शकलेली नाहीत. 
    वास्तविक साठ वर्षापूर्वी जेंव्हा ब्रिटनच्या नेतृत्वाखाली म्हणजे ब्रिटनची राणी इलिझाबेत यांना प्रमुख मानून राष्ट्रकुलस्पर्धांना आरंभ करण्यात आला तेंव्हाच ब्रिटनच्या जोखडातून दीडशे वर्षांनंतर मुक्त झाल्यावरही या देशांची ब्रिटनच्या वर्चस्वाखाली राहण्याची हौस संपली नाही का, अशी शंका अन्य देशातील विचारवंतांनी घेतली होती. ब्रिटनच्या जोखडाखालील देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता होतीच पण ती ब्रिटनच्या वर्चस्वाखालील अजून कोणते गुलामगिरीचे मुद्दे आहेत तो झुगारून देण्यासाठी एकत्र येणे आवश्यक होते. आपण आपल्या अर्थकारणात जे विस्कळीतपणाचे चित्र बघतो आहे त्याला ब्रिटन कारण आहे. ब्रिटिशांच्या वर्चस्वाखालील पन्नासहून अधिक देशात आज भारताप्रमाणेच अल्पसंख्यकांवर अवलंबून सरकारे आहेत. त्यांतील कोणताही देश अंग झटकून कामाला लागला आहे व प्रगती करत आहे असे घडलेले नाही. काही देशांनी प्रगती केली आहे पण तेथे ब्रिटीशची पिलावळ जेथे बहुसंख्य आहे तेथेच म्हणजे ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी ते शक्य झाले आहे. बाकीच्या सर्व देशांना ब्रिटिशांनी आजही पंगू करून ठेवले आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षात या देशातून किती लूट नेली याचा तर हिशोबच नाही. गेल्या साठ वर्षात भारतातील काळा पैसा गोळा करणार्‍यांनी विदेशी बँकेत एकूण  चारशे लक्ष कोटी ठेवल्याची माहिती पुढे येत आहे.उपलब्ध माहितीनुसार ब्रिटिशांची लूट यापेक्षा कितीतरी पट अधिक होती.अर्थात ती नेण्यास  दीडशे वर्षे लागली होती.  ती परत आणायची कशी याचापन्नास देशांचा मिळून विचार झाला असता. तर अशा कॉमन वेल्थ या विषयाचा विचार खर्‍या अर्थाने झाला असे म्हटले असते. पण कॉनम वेल्थ याचा अर्थ लावण्याची आणि कृती करण्याची जबाबदारी कलमाडी यांच्यावर सोपविल्याने त्यांनी त्यांचा निराळाच अर्थ लावला. ब्रिटिशांनी आपल्याला कायमच क्रिकेट व राष्ट्रकुलसारख्या प्रकारात अडकवून ठेवले. कलमाडी यांनी राष्ट्रकुलच्या बॅटनरिलेच्या कार्यक्रमातही भ्रष्टाचार केला, अशा माणसाकडून राष्ट्रीय चितनाची अपेक्षा काय करणार हा मुद्दा उरतोच.
-मोरेश्वर जोशी, पुणे

Leave a Comment