मावळच्या आंदोलनात मला बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न – अजित पवार

पुणे,दि.१४- मावळच्या पवनाधरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सतत तेथील विरोधी पक्षांच्या नेत्यांना चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहोत, पण प्रतिसाद मिळाला नाही. दि. ९ ऑगष्टरोजीच्या आंदोलनाच्या आदल्यादिवशीच जिल्ह्याधिकार्‍यांनी याबाबत एक बैठक बोलावली होती पण आंदोलकांनी त्यावर बहिष्कार टाकणेच पसंद केले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.
ते म्हणाले, बंद नळीतून पाणी आणले की, ६६टक्के पाणी वाचते. त्यामुळे यासाठी केंद्रसरकारची एक योजना घेअून आम्ही बंद नळातून पाणी घेण्याची योजना सुरु केली. ते करत असताना शेतकर्‍यांना साडेतीन टीएमसी पाणी राखून ठेवले होते. तेथे जेवढे शेती आहे ती सारी त्यात व्यवस्थित भिजत होती, तरीही विरोधी पक्षांनी शेतकर्‍यांना भडकवून आंदोलन करणे सुरु केले. सरकार बदनाम हेाण्यासाठी दि. ९ ऑगस्ट क्राँती दिनीच हे आंदोलन करण्याची तयारी आधी बरेच दिवस सुरु होती, असे दिसते.
    या आंदोलनात मला बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरु आहे, असे सांगताना ते म्हणाले, मी गोळीबाराचे आदेश दिले असे विरोध पक्ष सतत सांगत आहे.या आंदोलनात जी वाहने वापरण्यात आली त भाड्याची होती व आंदोलनासाठीच मागविली होती असे स्पष्ट होत आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्वनियोजित असण्याची शक्यता वाढते. पोलीसांनी गोळीबार केला तो समर्थनीय नव्हताच शेतकर्‍यांनीही एक्स्प्रेसहायवेवर कुंपणाच्या तार तोडून  आत येणे आणि रस्ता आडवून सभा घेणेही योग्य नव्हते असेही त्यांनी बोलून दाखविले.

Leave a Comment