आदर्श घोटाळ्याची चौकशी शेवटच्या टप्प्यात

नागपूर दि. १३ ऑगस्ट – आदर्श घोटाळ्याची चौकशी शेवटच्या टप्प्यात असून दोन महिन्यात न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात येईल अशी माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषी राजसिग यांनी  पत्रकार परिषदेत दिली. सीबीआयच्या अधिकार्‍यांच्या नागपूरात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
कुलाबा येथील बहुचर्चित आदर्श घोटाळ्याची द्विस्तरीय चौकशी आयोगाकडून चौकशी चालू आहे.या प्रकरणात आतापर्यंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख,सुशीलकुमार शिदे आणि अशोक चव्हाण यांनी आपले प्रतिज्ञापत्रक सादर केले आहे.तसेच संरक्षण दलाचे प्रतिनिधी आणि मुंबई शहर जिल्ह्याचे अधिकारी यांनी आयोगापुढे आपली उपस्थिती लावली आहे.यामुळे लवकरच चौकशी पूर्ण होण्याचे शक्यता त्यांनी वर्तविली .नागपुरात आतापर्यंत जनतेच्या १० तक्रारी मिळाल्या असून त्यापैकी ५ लेखी स्वरूपाच्या आहेत. त्यापैकी ३ पोलीस विभागासंदर्भात तर दोन वेस्टर्न कोल फिल्ड लिमीटेडमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आहे असे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासासाठी गेल्या वर्षभरात देशात ११८ साफळे रचण्यात आले होते. त्यापैकी ५० मुंबईमध्ये तर १२ साफळे नागपुरात रचण्यात आले. १६ ठिकाणी अचानक धाड टाकण्यात आल्या. नागपुरात १४ प्रकरणापैकी ५ प्रकरणामध्ये खटले न्यायालयात दाखल झाले आहे.
सीबीआयने देशात अनेक ठिकाणी धाड टाकल्यानंतर अनेक प्रकरण प्रलंबित राहात होती. यासाठी पंतप्रधानांनी त्यांच्या त्वरित निकालात काढण्यासाठी ७१ न्यायालये सुरू करण्याची घोषणा केली होती.  त्यापैकी ६ न्यायालये महाराष्ट्रत सुरू करण्यात आली आहेत. यातील तीन मुंबईमध्ये, एक पुणे येथे, एक नागपूरात तर एक अमरावतीत सुरू झाले आहे. नागपूरात ७० केंद्र सरकारचे कार्यालय आहेत.त्यापैकी फक्त ४-५ कार्यालयाच्याच तक्रारी आमच्याकडे येतात.वकीलांची कमतरता असल्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित होऊन राहात होती. त्यामुळे आता आम्ही वकीलांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती केली आहे. 

Leave a Comment