अण्णा हजारेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या कॉंग्रेस विरूद्ध पुण्यात निदर्शने

काँग्रेसने अण्णा हजारे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताच पुण्यातील भ्रष्टाचारनिर्मुलन समितीने आरोप सिद्ध करा किवा आरोप मागे घ्या, अशी मागणी करत मोठा मोर्चा काढला.१६ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या अण्णांच्या उपोषण विरोधात कॉंग्रेस सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.अण्णा हजारे हे वसूली, ब्लॅकमेलिग, दुसर्‍यांची संपत्ती जबरदस्तीने ताब्यात घेणे, स्वतःच्या मालकीच्या ट्रस्टचा गैरवापर करणे, यासारख्या अनेक भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. काँग्रेसने यासाठी २००५ सालच्या न्या. सावंत आयोगाचा हवाला दिला आहे.

पुण्यातील भ्रष्टाचारनिर्मुलन समितीच्या लोकांनी याविरोधात निदर्शनकरीत मोर्चा काढला.यात मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिती होती.

3 thoughts on “अण्णा हजारेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या कॉंग्रेस विरूद्ध पुण्यात निदर्शने”

  1. Mulat congress che rakt ch kharab ahe. tyanchi layki tyana dakhavlich pahije, ti tyana ni jamindost karunach………

     

Leave a Comment