शेतकर्‍यांवरवरील गोळीबार विरोधात न्यायालयात दाद मागणार – भारतीय किसान संघ

पुणे दि.१२- मवळबंद दरम्यान शेतकर्‍यांवर  करण्यात आलेला गोळीबार हा  निदणीय प्रकार असून  पोलीसांनी केलेल्या कारवाईमुळे बंदला हिसक स्वरूप प्रप्त झाले असा आरोप करत भारतीय किसान संघाच्या वतीने याबाबत सरकार विरूद्ध न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे काल पत्रकार परिषदेत सागण्यात आले. यावेळी पोलीसांनी केलेल्या कारवाईचा संघाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष माऊली तुपे, संघटक मंत्री दादा लाड, कोशाध्यक्ष मधुकर टेमगिरे, पुणे जिल्हामंत्री बाळासाहेब हगवने आदी उपस्थित होते.
टेमगिरे म्हणाले, गेली तीन वर्ष हा संघर्ष भारतीय संघाच्या नेतृत्वाखाली चालू आहे. या जलवाहिनीला एकूण ७२ गावांचा विरोध असून ९ ऑगस्टला केवळ बंद पाळण्यात येणार होता. परंतु, पोलीसांनी भाषण चालू असतानाच  लाठीमार आणि गोळीबार केल्याने बंदला हिसंक स्वरूप आले. या याबात सरकार विरोधात न्यायलयात खटला दाखल करणार असून त्यात पोलीस अधिक्षक संदिप कर्णीक यांचेही नाव असणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले. तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचेही त्यांनी सांगितले. या घटने नंतर  शेतकार्‍यांना  करण्यात आलेले अटक  आणि निलंबीत करण्यात आलेले पोलीस हा शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही किसान संघाच्या वतीने यावेळी  करण्यात आला. पहिल्यांदा खाजगी गाडीतून गोळीबार करण्यात आला असेल तर पोलीसांनी  ते सिद्ध करावे असे सांगून टेमगिरे म्हणाले, पोलीसांनी पळत असलेल्या शेतकर्‍यांवर मागून गोळीबार केला आहे.शेतकर्‍यांचे हे आंदोलन असून कोणत्याही राजकिय पक्षाच्या हातात जावून देणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले. पवना जलवाहिनीचे काम कायमस्वरूपी थांबवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Leave a Comment