ई-लर्निंग हा आगामी काळात परवलीचा शब्द – डॉ. जब्बार पटेल

पुणे, दि.१२- ई-लर्निंग हा आगामी काळात परवलीचा शब्द राहणार असून प्रत्येक वयोगटाला तो उपयोगी राहणार आहे. भारतासारख्या देशात उच्च शिक्षणासाठी त्याचा फार उपयोग होणार आहे.  भारतात उच्च शिक्षणाचे प्रमाण केवळ १२ टक्के तर जागतिक पातळीवरील उच्च शिक्षणाचे प्रमाण जवळपास २३ टक्के आहे.  उच्च शिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी पारंपरिक शिक्षण पद्धती अपुरी पडत असल्याने देशाने ई-लर्निंगचे महत्त्व ओळखून या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ दिगदर्शक आणि सीईसी(कॉन्सॉर्टिअम ङ्गॉर एज्युकेशनल कम्युनिकेशन) चे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यंनी व्यक्त केले.
 ते पुणे विद्यापीठातील ईएमआरसी मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सीईसीचे संचालक टी. आर. केम, ईएमआरसीचे संचालक समीरन वाळवेकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, सीईसी अंतर्गत सर्व अभ्यास विषयावर माहिती ऑडिओ, व्हिडीओच्या स्वरूपात तयार करण्याचे काम ईएमआरसी करत आहे. या कामात खाजगी विद्यापीठांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. या माध्यमातून तयार झालेली माहिती दूरदर्शनवरील वाहिन्या व इंटरनेट उपलब्ध करून देण्यात येईल. यातून विद्यार्थ्याला-विद्यार्थी जोडला जाणार आहे. या माध्यामाला कोणतीही सीमा नाही. देशातील कोणत्याही राज्यात, खेड्यात यांचा प्रसार केला जाणार आहे.  यातून चागंला विद्यार्थी, चांगला नागरिक तयार करण्याचे ध्येय आहे. मी स्वतः सीईसीला एक आव्हान समजतो. चांगले एडीटिग, चांगले छायाचित्रण आणि उत्कृष्ट ज्ञान यांचा सुवर्ण संगम साधण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी बोलताना सीईसीचे संचालक केम म्हणाले, आता व्यास आणि ज्ञानदर्शन या वाहिन्यावरून सीईसीच्या कार्यक्रमांचे प्रसारण सुरू आहे. केवळ ७-८ महिन्यात प्रत्येक विषयाला एक अशी वाहिनी सुरू करणार आहे. देशात ईएमआरसीचे १७ केंद्रं आहेत. त्य प्रत्येक केंद्रांना विविध विषय देऊन माहिती तयार करण्याचे काम सुरू आहे. सीईसीचे कार्यक्रम पारंपरिक शिक्षणाला पर्याय आहेत असे नाही; पण ते पारंपरिक शिक्षण, मुक्त शिक्षण, आणि ई-लर्निंग य सर्व क्षेत्रांन फायदेशीर ठरणार आहे. यंच माध्यमातून विद्यार्थ्यंना प्रवेश, शिक्षण, त्यंची परीक्षा आणि प्रमाणपत्र देण्यचे काम केले जाईल, त्यसाठी व्हर्च्युअल विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार आहे. भारत सरकारने यसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment