स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दुरूस्तीच्या कामानिमित्ताने वर्षभर प्रेक्षकांसाठी बंद

न्यूयॉर्क- येथील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा) दुरूस्तीच्या कामानिमित्ताने वर्षभर प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्यात येणार असून या दुरूस्तीच्या कामासाठी २७२.५लाख डॉलर्स खर्च येणार असल्याचे समजते. अमेरिकेचे गृहमंत्री केन साल्झर यांनी बुधवारी ही घोषणा केली.
  अमेरिकेतील हे राष्ट्रीय स्मारक असून या पुतळ्याला दररोज हजारोंच्या संख्येने प्रेक्षक भेट देतात. या पुतळ्यात वरपर्यंत चढून जाता येते. मात्र वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर पुतळ्याच्या मुकुटात प्रवेश बंद करण्यात आला होता तो ४ जुलै २००९ पासून पुन्हा सुरू करण्यात आला होता. या पुतळ्यातील लिफट, अग्निशमन यंत्रणा यांची दुरूस्ती करून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे तसेच स्वच्छतागृहांचीही सुधारणा करण्यात येणार आहे असे समजते.

Leave a Comment