
पुणे-पवनानदी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेले मोरेश्वर साठे हे यांना अटक केल्यावर ते गोळीबारात मृत्यूमुखी कसे पडले, गोळीबाराला कोणी अज्ञान मोटारवाल्याने सुरुवात केली तर मग त्या बाबत पोलीसांनी जबाबासाठी पुढे आणलेली व्यक्ती मूळच्या जबाबात ‘तसे मी कांही पाहिले नाही’ असे कबूल करून बसली आहे, अशा अनेक विरोधाभासाचा सामना करण्यात आज पुणे जिल्हा पोलीसांचा दिवस गेला. माहिती तंत्रज्ञानाची प्रगती ही आज पुणे जिल्हा पोलीसांची सर्वात मोठी अडचण बनली. कारण जेंव्हा पोलीस आंदोलकावर गोळीबारासाठी बंदुकीचा नेम धरून बसले होते तेंव्हा बहुतेक वाहिन्याचे कॅमेरामन उंच टेकाडावर सर्व बाबी कॅमेर्यानें टिपत होते. आज तरी पवनानदीच्या पाणयासाठी आंदोलन करणार्यावर गोळीबाराचे समर्थन करण्याचा प्रत्येक प्रयत्न वाहिन्यांनी दाखवलेल्या कव्हरेजमधूनच परस्पर टोलवला जात होता.
याबाबत शिवसेनानेते उद्धव ठाकरे यानी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले पाण्यासाठी आंदोलन करणाया शेतकयांवर गोळीबार करणारे सरकार जनतेचे रक्षक आहे की नरभक्षक आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पवनेच्या पाण्यावरून मावळात झालेल्या रक्तरंजित आंदोलनानंतर ठाकरे यांनी तळेगाव आणि परिसरात भेट देऊन गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांचे कुटुंबिय आनि नातेवाईक यांची भेट घेतली. तसेच शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची विचारपूस केली.त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासह पक्ष प्रवक्त्या डॉ. नीलम गोहे खासदार गजानन बाबर र्संफप्रमुख मच्छिंद्र खराडे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, राज्यात कोणाचीही टगेगिरी चालू देणार नाही. पोलिसांवर सरकारचा वचक नसल्यानेच राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचा आरोप करून ते म्हणाले की कायदा सुव्यवस्था राखू न शकणाया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा.
बऊर येथे आंदोलन करणाया मोरेश्वर साठे यांचा पोलिसांनी खून केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. गोळीबार सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी साठे यांना ताब्यात घेतले होते. मग ठाकरे गोळीबारात मृत्युमुखी कसे पडले असा सवाल त्यांनी केला.पवनेच्या पाण्याचा प्रश्न एकत्र बसून सुटू शकतो. मात्र वेळ आल्यास या प्रश्नासाठी शिवसेना न्यायालयीन लढाई लढेल असेही त्यांनी सांगितले.
पोलीसअधीक्षक कर्णिक यांची पत्रकार परिषद
