समृद्धीचे मार्केटिंग करण्याची गरज – मिलिद गुणाजी

नागपूर – जंगल, पर्वत, किल्ल्यांबाबत विदर्भ समृद्ध आहे, पण निसर्गाच्या कृपेने लाभलेल्या या समृद्धीचे मार्केटिंग होणे आवश्यक आहे. तसे झाले तरच विकास होईल आणि पर्यटकांची भटकंती देखील वाढेल, असा विश्वास प्रसिद्ध अभिनेता मिलिद गुणाजी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
पर्यटनाच्या क्षेत्रात केवळ नैसर्गिक लेणे लाभूनही काहीच होत नाही. त्याची योग्य माहिती जगभर पोहोचविणे महत्वाचे असते, असे सांगून गुणाजी पुढे म्हणाले की, विदर्भाच्या बाबतीत रस्ते आणि माकर्ेटिग या गोष्टी होणे आवश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पेंच, नागझिरा, नवेगाव यांसारखी जंगले, नरनाळ्यासारखे प्राचीन किल्ले ही विदर्भाची पर्यटन क्षेत्रातील संपत्ती आहे. मेळघाटी सातपुडा या पुस्तकात विदर्भातील जंगलाची आणि नद्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. ते पुस्तक वाचल्यावर अनेक ठिकाणी आपणही ऐकलेली नसल्याचे लक्षात आले. हे केवळ पर्यटकांचेच नव्हे, तर विदर्भाचेही दुर्दव आहे. आपले अनवट शब्दसूर डोंगरवारा हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याचेही त्याने सांगितले.

Leave a Comment