पंतप्रधानांचे निवृत्त सचीव बी जी देशमुख यांचे निधन

पुणे- पंतप्रधानांचे निवृत्त सचीव यांचे आज सायंकाळी येथे मेंदूच्या रक्तस्रावाने निधन झाले ते ८४ वर्षाचे होते.महाराष्ट्र सरकार,केंद्रसरकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी अनेक ठिकाणी जबाबदारीच्या ठिकाणी काम केले होते. ते आय ए एस होते. १९५१मध्ये त्यांनी भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. १९८६ ते १९८९ या काळात ते पंतप्रधानांचे सचीव होते. प्रामुख्याने राजीव गांधी यांच्या बरोबर मुख्य सचीव म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. राजीव गांधी याना कार्यक्रम अंमलबजावणीची घाई असायची पण देशमुख हे धिम्या गतीने काम करणारे अधिकारी होते यावरून राजीव गांधी याच्याशी त्यांचे मतभेद झाले होते.महाराष्ट्रात ते प्रमुख सचीव होते व त्यापूर्वी त्यांनी निरनिराळ्या सचीवपदावर काम केले होते

Leave a Comment