मोबाईल, एलसीडीची बाजारपेठ दुपटीने वाढणार

मुंबई- गेल्या काही वर्षात देशातील ग्राहकांचा एलसीडी टीव्ही, स्मार्ट फोन यांच्याकडे कल वाढला आहे. या वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाली असून येत्या काही वर्षात त्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे येत्या चार वर्षात या वस्तूंची बाजारपेठ दुपटीने वाढेल.
भारतातील या वस्तूंना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांची वाढती मागणी लक्षात घेता अनेक आंतराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन निर्मितीचे प्रकल्प देशात उभारले आहेत. यामध्ये व्यवसायासाठी अनुकुल धोरण व ग्राहकांचा बदललेला कल यामुळे एलसीडी, मोबाईल, संगणक यांची मोठी खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या असलेली ८.२ अब्ज डॉलरची बाजारपेठे येत्या ४ वर्षात दुपटीने वाढणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत देशातील दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विकास झाला आहे. यामुळे मोबाईल व संगणक उद्योगांची भरभराट झाली आहे. या वस्तूंची मागणी अशीच वाढत राहिल्यास या क्षेत्राचा मोठा विकास होईल.

Leave a Comment