मी दिग्दर्शकाचा अभिनेता – अभिनेते दिलीप प्रभावळकर

पुणे – ‘लगे रहो नुन्नाभाई’ चित्रपटाच्या माध्यमातुन गांधीगीरी जगाला शिकवली मला मात्र गांधीगिरी करण्याची कधी आवश्यकता भासली नाही. परंतु भूमिकेची तयारी करताना ज्या व्यक्तीरेखांचा अभ्यास केला जातो त्याचा कलाकाराच्या आयुष्यावर परिणाम होत नाही मात्र काही  सकारात्मक बदल नक्की होतात असे मत प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.ज्ञानगंगा आयोजीत ज्ञानोत्सव २०११ च्या उद्घाटनानंतर अरुण नुलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रभावळकर बोलत होते. यावेळी उमेश पाटील, पत्रकार नवनित देशपांडे, राजहंस प्रकाशनचे सदानंद बोरसे आदी उपस्थित होते.
प्रभावळकर म्हणाले, मी दिग्दर्शकाचा अभिनेता आणि संपादकाचा लेखक आहे कारण माझ्या कडून या लोकांनी चांगले ते काढून घेतले आहे. मी अभिनया आगोदर लिखानाला सूरूवात केली असली तरी माझ्यातील अभिनेत्याने कायमच लेखकावर कुरघोडी केली आहे. अभिनेत्याने केलेल्या कुरघोडी मुळेच माझे लिखान हे अभिनयप्रधान आहे असे काही लोकांचे मत बनले आहे आणि ते बोक्या सातबंडेच्या यशावरुन लक्षात येते कारण मी श्रृतीका म्हणून लिहिलेली ही मालिका सर्वच माध्यमात यशस्वी ठरली आहे. माझ्यातील अभिनेत्याला लेखक असण्याचा फायदा झाला असल्याची कबुली प्रभावळकर यांनी यवेळी दिली.
अभिनयइतरांसाठी आणि लेखन स्वःतसाठी असे अनेकांचे असते मात्र  माझे लिखान नेहमीच इतरांसाठी राहिले आहे कारण ते लोखान मझ्यातील अभिनेत्याने लिहुन घेतले आहे. षटकार मधील गुगली सदरात अनेक क्रिकेटपट्टूना चिमटे काढले मात्र आज आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटला आलेले व्यवसायिक स्वरुप आवडत नाही असे सांगतानाच या आएपीएलला मिळालेल्या अल्प प्रतिसादाचा आनंद झाल्याचे त्यांनी सांगीतले.
मुन्नाभाई मध्ये गांधीजींची भुमिका साकारतांना मेकअपचा त्रास व्हायचा मात्र अत्यंत शांत स्वभावाचा अभिनयकरायचा होता यामुळे गांधीजीची भुमिका साकारताना अभिनयाचा कस लागला. मुन्नाभाईच्या यशात सर्वात मोठा वाटा आणि खरा हिरो राजकुमार हिराणी आहे असे प्रभावळकर म्हणाले. यावेळी प्रभावळकर यांच्या बोक्या सातबंडेच्या भाग ६ व ७, एका खेळीयानेच्या ५ व्या आवृतीचे आणि कागदी बाणाच्या ४ थ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयदिप पाठकजी यांनी केले.

Leave a Comment