पालिका निवडणुकांची चाहूल

सध्या महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे सेमी फायनल सामन्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.विधानसभा निवडणूक  २०१४ साली होईल आणि  १८ महानगर पालिकांच्या  निवडणुका २१०२ आणि २०१३ साली होतील. महाराष्ट्र हे देशातले मोठे शहरीकरण झालेले राज्य असल्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुकांत राज्यातल्या एकूण मतदानाच्या ३० टक्के मतदाय मतदान करतात. त्यावरून विधानसभेत काय होईल याचा अंदाज बांधणे शक्य होते. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. त्यातल्या धुळे, नगर, जळगाव, सांगली या निवडणुका २०१३ सालच्या उत्तरार्धात होतील. तर नांदेड आणि मीरा-भायंदर (जि.ठाणे) या निवडणुका २०१३ च्या पूर्वार्धात होतील. बाकीच्या १२ महानगरपालिकांच्या निवडणुका २०१२ साली होणे अपेक्षित आहे. त्या महानगर पालिका अशा, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर, अकोला, अमरावती, ठाणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव. मुंबईची महानगर पालिका ही देशातली सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका आहे. ती कोणाच्या ताब्यात राहणार याचा निकाल लागणार १२ साली लागणार आहे.

ती सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या हातात आहे. २००७ सालच्या निवडणुकीत या महानगरपालिकेत अपेक्षा नसताना युती सत्तेवर आली. कारण त्यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत  युतीला धक्का बसला होता. शिवाय मनसेची स्थापना झाली होती. या दोन गोष्टी प्रतिकूल असतानाही  युतीने २००७ साली ही मनपा आपल्य ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. शिवसेनेला महापालिकेतल्या ८२ जागा मिळाल्या तर  भाजपाला २७. मनसेला केवळ ६ जागा मिळाल्या. २००७ सालनंतरही युतीला धक्के बसले. २००९ सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या विधानसभेच्या ३६ पैकी केवळ ९ जागा युतीला मिळाल्या. आता पुन्हा एकदा याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. गेल्या काही वर्षातला अनुभव असा आहे की, मुंबईतले मतदार विधानसभा आणि महानगरपालिका यांसाठी मतदान करताना वेगळा विचार करतात. म्हणूनच शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यनी याही वेळी महानगरपालिका आपल्याच ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.         

राज ठाकरे  सध्याचा गुजरात दौर्‍यावर आहेत.गुजरातेत जाऊन नरेन्दा्र मोदी यांची तारीफ केली आणि मुंबईत परत येऊन तीच रेकॉर्ड लावली की, मुंबईतले गुजराती मतदार आपल्या बाजूला वळतील असा राज ठाकरे यांचा अंदाज असावा असे काही लोकांना वाटते. यात किती तथ्य आहे हे नंतरच कळेल पण राज ठाकरे असा प्रयत्न करू शकतात हे नाकारता येत नाही.  मनसे हा घटक भाजपा-सेना युतीला घातक ठरू शकतो  असे गृहित धरले तरी त्याची भरपाई करण्यासाठी आता युतीने आपल्या सोबत भीमशक्तीला घेतले आहे. त्याचा काही ना काही फायदा या युतीला होईल हे कोणीच नाकारत नाही. उलट हा संभाव्य परिणाम जाणवत असल्यामुळेच दोन्ही काँग्रेस पक्षांनी दलितांना जवळ करण्याचे मार्ग अवलंबायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या महानगर पालिकात लोकांनी शिवसेनेची पिछेहाट आणि मनसेचा किंचित का होईना पण वाढणारा प्रभाव अनुभवला आहे. मुंबईत एकवेळ ठीक आहे पण मुंबईच्या परिसरातल्या आणि ठाणे जिल्हयातल्या महानगर पालिकांत शिवसेनेची स्थिती भक्कम नाही. तिथे मनसे तिला धक्के देण्याच्या तयारीत आहे. हे  नाकारता येत नाही.

महाराष्ट्रात भीमशक्ती आणि शिवशक्ती यांची एकी झाली आहे. तिच्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण निर्माण हईल असे म्हटले जात आहे. या युतीने काय घडेल याची पहिली परीक्षा या महानगर पालिकांच्या निवडणुकीत होणार आहे.   महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरणाची झलक दिसणार आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती यच्या युतीने बेरीजच होणार असे सर्वसाधारणपणे समजले जात आहे पण शिवसेना आणि भाजपाच्या काही उच्चवर्णीय मनस्थितीच्या मतदारांन अशा रितीने दलितांशी युती करणे आवडलेले नाही असेही मानले जात आहे. तसे असेल तर ते याच निवडणुकीत दिसेल. भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या युतीचा परिणाम नागपूर, अकोला आणि अमरावती या विदर्भातल्या तीन महानगरपालिकांत दिसू शकतो.  सोलापूर, पुणे आणि पिपरी चिंचवड या तीन महानगर पालिका फार महत्त्वाच्या आहेत. तिथे काँगसचे वर्चस्व आहे पण याही ठिकाणी भीमशक्तीच्या प्रभावाचे प्रत्यंतर येईल. पुण्यात कलमाडी यांची अनुपस्थिती जाणवेल. सोलापुरातला काँग्रेसचा गोंधळ आणि पिपरी चिंचवडातली राष्ट्रवादी काँग्रेसमधली धुळवड या पक्षांना घातक ठरणारी आहे पण त्यांना पर्याय देण्यात भाजपा-सेना युतीला यश आलेले नाही

Leave a Comment