…आणि नाना पाटेकर यांच्यामुळे बाबा आमटेंना एक कोटी मिळाले

पुणे – आयुष्यात व्यक्ती श्रीमंत झाला की स्वतःचा गौरव करून घेत असतात. परंतू फायफाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा पुरस्कार हा योग्य व्यक्तीलाच दिला जातो. म्हणून डी एस कुलकर्णी यांना मिळालेला पुरस्कार हा सच्चा पुरस्कार आहे. याचा मला अभिमान वाटतो. असे उद्गार प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले.

फायफाऊंडेशनच्या वतीने औद्योगीक क्षेत्रात उल्लेखनियकामगिरी करणारे प्रसिध्द उद्योगपती डी.एस.कुलकर्णी यांना प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. प्रसिध्द उद्योगपती डी.एस.कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी, फाऊंडेशनचे विश्वस्त डॅा. एस. पी. मर्दा, माधुरी मर्दा, वी.सी. जोशी, ज्येष्ट समाजसेविका निर्मला पुरंदरे आदी उपस्थित होते.

फायफाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी कोणतीही शिफारस किवा पत्रव्यवहार होत नाही. देशात ज्या व्यक्तीचे कार्य मोठे आणि समाजासाठी असते अशा निवडक आणि योग्य व्यक्तीलाच फाऊंडेशन पुरस्कार देत असते. त्यामुळे डी.एस. कुलकर्णी यांना मिळालेला पुरस्कार सच्चा पुरस्कार आहे. कारण स्वप्नात मला पद्मश्री मिळावा असे वाटते. त्याचा बहुमानही मोठा आहे. परंतू त्यासाठी शिफारस करावी लागते असे म्हणतात, परंतु ही शिफारस करणार कोण आणि अशी शिफारस करून दिलेला पुरस्कार म्हणजे……!

आयुष्यात बाबा आमटेंचे समाजकार्य खूप मोठे आहे. त्यांचा वारसा आज त्यांचे सर्व कुटुंबीयचालवत आहे. जीवनात त्याग सुध्दा अशा अनुवंशीक असू शकतो हे आनंदवनात बाबा आमटेंच्या कुटुंबाकडे पाहिल्यावर कळते. अशी भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

आयुष्यात अनेक उद्योग केले म्हणून आज उद्योगपती झालो. परंतू हे उद्योग प्रामाणिक कष्ट करून केले. जीवनात पहिला व्यवसायटेलिस्मेलचा केला तो आजही सुरू आहे. लहानपणापासून कसबा पेठेत राहिलो म्हणून उद्योगपती होऊ शकलो सदाशिव पेठेत असतो तर बँकेत क्लार्क म्हणून नोकरी करत असतो. जीवनात नोकर्‍यांच्या मागे न लागता नोकर्‍या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी तरूणवर्गांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णयघेतला आहे. ज्या तरूणाला नव्याने उद्योग सुरू करायचा असेल त्यांना बँकेतून कमी व्याजदरात आणि स्वतः जामीन राहून कर्ज मिळवून देणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

याप्रसंगी निर्मला पुरंदरे यांनीही मनोगत व्यक्त केले. डी.एस. कुलकर्णी यांनी पुरस्कारात मिळालेली एक लाख रूपये आणि त्याच्याकडील एक लाख असे मिळून दोन लाख रूपये निर्मला पुरंदरे यांच्या वनस्थळी ग्रामीण विकास संस्थेला देणगी देण्यात आले. तसेच वेदिका फडके व तेजस मिनासी या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

तुमच्या एक कोटीबरोबर माझेही एक कोटी………

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी मनोगमध्ये नाना पाटेकर म्हणाले, डी.एस. कुलकर्णी यांना पुरस्कारात मिळालेल्या एक लाखाच्या एकमेत आजून एक लाख रूपये मिळवून निर्मला पुरंदरे यांच्या संस्थेला दोन लाखाची देणगी दिली. बाबा आमटेंचे कार्य हे खूप मोठे असून, त्यांच्या आश्रमाला एक कोटी रूपये देण्याची माझी इच्छा आहे. परंतू ती रक्कम मी डी.एस. कुलकर्णींना देणार म्हणजे त्या एक कोटीचे दोन कोटी होतील. असे म्हणताच डी.एस. कुलकर्णी यांनी बाबा आमटेंच्या आश्रमाला एक कोटी देण्याचे जाहीर केले.

Leave a Comment