सचिन तेंडुलकरला भारतरत्न मिळावे – सरकारकडे प्रस्ताव

नवी दिल्ली-देशातील विविध स्तरांतून क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकर याला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेले भारतरत्न दिले जावे अशी विनंती केंद्रसरकारकडे आली असून या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करणार असल्याचे वृत्त आहे.
      राष्ट्रपती सचिवालया नटिफिकेशन नुसार कला, साहित्य , विज्ञान आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रात लक्षणीय योगदान देणार्‍या नागरिकांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जातो असे गृहराज्यमंत्री मुलापल्ली रामचंद्रन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावणार्‍या सचिन तेंडुलकरला हा सन्मान दिला जावा व त्यासाठी आवश्यकतेनुसार हा पुरस्कार देण्यासाठीच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात यावी अशी विनंती अनेक थरांतून सरकारकडे आली असल्याचे त्यांनी मान्य केले. इतकेच नव्हे तर सरकारने याबाबत चर्चा करण्याचे ठरविले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment