लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्यक – दादा जे.पी. वासवानी

पुणे – भ्रष्टाचार ही आज मोठी समस्या आहे भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लोकपाल विधेयक येतेय ही चांगली बाब आसली तरी भ्रष्टाचार थांबविण्यासाठी एखादा नविन कायदा तयार करण्यापेक्षा लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन दादा जे.पी. वासवानी यांनी केले.साधु वसवानी मिशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या साधु वासवानी यांचा जीवनपट उलगडुन दाखविणार्‍या ‘दर्शन’ या संग्रहालयाचे उद्घाटन आज प्रसिद्ध अभिनेता अमिर खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमिर खान यांनी घेतलेल्या अनौपचारीक मुलाखतीमध्ये दादा वासवानी बोलत होते. यावेळी अमिर खान यांच्या हस्ते दादा वसवानी यांच्या ‘व्हाट टु डु व्हेन डिफिकल्टी स्ट्राईक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
दादा म्हणाले, आपण कोणत्या जातीचे, धर्माचे किवा वंशाचे आहोत यापेक्षा आपण भारत मातेचे लेकरे आहोत हे ध्यानत ठेवले पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती मी काय करू शकतो असे म्हणत असतो मात्र प्रत्येक व्यक्ती मध्ये असलेला आत्मविश्वास जागृत असेल तर प्रत्येक गोष्ट साध्य करता येते आणि या आत्मविश्वासाच्या बळावरच नविन भारताची निर्मिती होणार अहे. साधु वासवानी यांच्या विचारांमुळेच आज मी इथपर्यंत पोहचलो आहे, अनेकांची सेवा करण्याची संधी मला या मिशनमुळे मिळाली अहे असे सांगतांना दादा म्हणाले कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर ती प्रेमानेच जिकता येते. महाविद्यालयात असताना मी एक पुस्तक दिवसभरात वाचत असे मात्र मला खेलामध्ये विशेष रस नव्हता, मला प्रवास करायला आवडतो परंतु पायी चालायला जास्त आवडते असे दादांनी सांगीतले.
अमिर खान म्हणाला, मी कोणत्याही अध्यात्मिक गुरुकडे जात नाही,  मला दादांच्या सहवासात मनशांती मिळते, दादा माझ्या साठी स्पेशल व्यक्ती आहेत. माझ्या दिवसाची सूरूवात मी दादांच्या विचारांनी करतो. दादांच्या विनंतीला मान देऊन अमिरने त्याच्या आवडते किशोरकुमार यांनी गायलेले ‘आँचल मे तुझे लेके चले, एक ऐसे गगन के तले’ हे गीत गायले.

Leave a Comment