प्रशासकीययंत्रणा सपशेल अपयशी -डॉ. भटकर

पुणे-भारतीय लोकशाही घटनेची रचना करताना सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कराव्या लागणार्‍या उपाय योजनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. परंतु ते उपाय कार्यान्वित करण्यात प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे,असे मत जेष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त केले. माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०१० मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरहदचे संजय नहार होत. प्रा. एस. एस. दराडे-पाटील, संचालक प्रा. डॉ. मंगश कराड, प्रा. राहुल कराड,  प्रा. डी. पी. आपटे, केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०१० मध्ये देशात प्रथम आलेली  एस. दिव्यदर्शनी व तृतीय आर. व्ही. वरूणकुमार उपस्थित होते.

डॉ. भटकर म्हणाले, २१ व्या शतकात भारत संपूर्ण जगाचे नेतृव करणार आहे.  भारताची वाढती लोकसंख्या हा एक चितेचा विषय होता. परंतु हीच लोकसंख्या भारताच्या प्रगतीची आशा बनलेली असून तीच ताकद भारतास संपूर्ण जगात नावारूपास आणणार आहे. जगात भारतीय लोकशाहीला आदर्श लोकशाही म्हणून गणले जाते. भारताची आज सर्वच क्षेत्रात घोडदौड सुरू असून विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय प्रगती साधली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन प्रशासकीय यंत्रणेत आलेल्या आणि येऊ इच्छिणार्‍या तरुणांनी कॉमन मॅन हा केंद्रस्थानी ठेऊन ध्येय-धोरणांची आखणी केली पाहिजे. दशातील सर्वसामान्य माणसाला प्रगतीची दिशा दाखवणे, हीच खरी देशभ*ती ठरू शकते, असे डॉ. भटकर यांनी सांगितले.

एस. दिव्यदशर्ननी  म्हणाली, आम्हाला मिळालेल्या यशाद्वारे आम्ही राष्ट्राची सेवा करू. आजवर राष्ट्राच्या साधनसामुग्रीचा आमच्या प्रगतीसाठी केलेल्या उपयोगाची परतफेड येणार्‍या काळात आम्ही नक्कीच करू. कार्तिक अय्यर, हर्ष पोदार, आर. व्ही. वरूण कुमार आदींनी  यावेळी मनोगत व्यक्त केले.  यावेळी ७३ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. युपीएससीमध्ये प्रथम आलेल्या एस. दिव्यदर्शनीस ५१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, तर तृतीय आलेल्या  आर. व्ही. वरूणकुमार यास ३१ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रा. राहुल कराड मांनी प्रास्ताविक केले. प्रा. वाणी रामनाथन मांनी सूत्रसंचालन, प्रा. डी. पी. आपटे मांनी आभार मानले.

Leave a Comment