डॉ कोटा हरिनारायण यांना लोकमान्य टिळक सन्मान प्रदान

पुणे – छोटे लढाउ विमान तयार करण्याच्या तंत्रज्ञानाने संरक्षण क्षेत्राला तर फायदा झालाच पण त्याच बरोबर देशातील दीडशेहून अधिक कारखान्यानना त्यांच्या क्षेत्रात ते तंत्रज्ञान वापरता आले. पुढील चार वर्षात भारत संरक्षक उत्पादन क्षेत्रात अधिक स्वावलंबी होईल, असे देशातील पहिले कमी वजनाचे छोटे लढाउ विमान तयार करणारे डॉ कोटा हरिनारायण यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितले. लोकमान्य टिळक यांच्या ९१ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असा पुरस्कार देण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिदे होते.

डॉ कोटा म्हणाले, अत्यंत कमी वजनाची कार्बन ट्यूब आम्ही  तयार करतो त्याचा प्रामुख्यात विमानात वापर होतो पण त्याचा पोलिओ ग्रस्तांचे कृत्रीम पाय तयार करण्यासाठीही उपयोग होअू शकतो. या प्रमाणे आम्ही विमानात वापरलेल्या सर्व तंत्राचा वापर उद्योग क्षेत्रात केला त्यामुळे देशातील दीडशेपेक्षा अधिक उद्योगात त्याचा वापर झाला. सन१९९९ पर्यंत आपण लढाउ विमान निर्मिती क्षेत्रात पूर्णपणे परावलंबी  होतो नंतर मात्र ही कोंडी फुटली लवकरच आपण मोठ्या प्रमाणावर या लढाउ विमानांची निर्यात करू शकणार आहोत.श्री सुशीलकुमार शिदें म्हणाले, डॉ कोटा हरिनारायण यांच्या या शोधामुळे संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेला एक नवी दिशा मिळाली आहे. पुढील दशकात आपण  चंद्रावरील समृद्ध युरेनियम आणू शकणार आहोत या यशाला डॉ कोटा हरिनारायण यांनी आरंभ करून दिला आहे.

लो. टिळक विश्वस्त निधीचे अध्यक्ष डॉ दिपक टिळक यांनी प्रथम प्रास्ताविक केले.लोकमान्य टिळक पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे यापूवीं हा पुरस्कार एस एम जोशी, इंदिरा गांधी, , रा.स्व.संघाचे सरसंघचालक श्री बाळासाहेब देवरस, अटलविहारी बाजपेयी, टी एन शेषन, डॉ माशेलकर, डॉ भटकर यांना प्रदान करण्यात आले आहे.

Leave a Comment