एल अँड टीला कतारचे मोठे कंत्राट

मुंबई  – लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अँड टी) च्या वीज वितरण आणि पारेषण विभागाने आंतराष्ट्रीय ई.पी.सी. ऑर्डर अंतर्गत कतार जनरल इलेक्ट्रीसिटी अॅण्ड वॉटर कॉपॉरेशनकडून कतारमध्ये १३ अतिउच्च दाबाची विदयुत सबस्टेशन्स बांधण्याचे १२१० कोटी रूपयांचे महत्वपूर्ण कंत्राट मिळाले आहे. एल अँड टीला आखाती देशातून मिळालेली ही सर्वात मोठी ऑर्डर आहे. कंपनीला हा प्रकल्प १८ ते २६ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायचा आहे.

Leave a Comment