
सुष्मिता सेन चित्रपट निर्मितीकडे आपले नशिब आजमावणार असल्याची घोषणा तिने खूप आधीच केली होती. झाशीच्या राणीचे चरित्र साकारणारा चित्रपट करण्याची घोषणा देखील तिने केली होती. ज्यात ती स्वतःच प्रमुख भूमिकेत दिसणार होती. परंतु या चित्रपटासाठी चांगला दिग्दर्शक न मिळाल्याने तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.खरे तर हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी अनेक नामांकित दिग्दर्शक उत्सुक असल्याचे सांगितले जाते. पण सुश्मिता मात्र स्वतःच हा चित्रपट दिग्दर्शित करू इच्छित असल्यामुळे सह-निर्मात्यांशी चर्चेची गुर्हावळे सुरूच आहेत. निर्माता केतन मेहता सुद्धा ऐश्वर्या रॉयला सोबत घेऊन झाशीच्या राणीवर चित्रपट बनविणार आहे. त्यामुळे आपला चित्रपट लवकर पूर्ण करून तो प्रदर्शित करण्यातच सुष्मिता सेनचा फायदा आहे.