लाखो वारकऱ्यांचा पंढरीत प्रवेश

पंढरपूर – जगत्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगाप्रमाणे लाखो वैष्णवांना आता केवळ विठ्ठल भेटीची ओढ लागली असून संतांसमवेत महाराष्ट्रच्या दर्याखोर्या तून निघालेले लाखो वैष्णव वाखरीत दाखल झाले आहेत. रविवारी वैष्णवांचे माहेर असलेल्या पंढरी नगरीत वारकर्यांलनी प्रवेश केला. शनिवारी बाजीराव विहीरीजवळील उभ्या व गोल रिंगणाचा सोहळा लाखो वैष्णवांनी आपल्या डोळ्यात साठविला. ढगाळ वातावरणात अश्वांनी नेत्रदिपक दौड केल्याने वारकर्यां नी विठ्ठल भेटीचा आनंद अनुभवला.
चराचराला चालना देणारा विठ्ठल हे वैष्णवांचे जीवन आहे. आगम निगमाचे स्थान आहे. सिद्धीचे साधन आहे आणि तोच खरा वारकरी सांप्रदायाचा विसावा आहे. या भावनेने गेली २८ युगे सुरू असलेली पंढरीच्या वारीची परंपरा आजच्या विज्ञानयुगातही कायम राहिली आहे. टाळ मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत महाराष्ट्रच्या दर्याखोर्याजतून संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत एकनाथ, संत जनाबाई आदि संतांसह लाखो वैष्णव भागवत धर्माची पताका फडकावित माहेरच्या ओढीने पंढरीस येतात. या लाखो वैष्णवांची मांदियाळी दिड्या, पताकांच्या लवाजम्यासह पंढरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाखरीच्या पालखी तळावर विसावली आहे.
कांदेनवमीनिमित्त शनिवारी दिड्या दिड्यात वारकर्यांयनी कांदा भज्याचा आस्वाद घेतला व पंढरीची वाट धरली. पिराची कुरोली येथून श्री संत तुकाराम महाराज तर भंडीशेगांवहून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळे वाखरीकडे मार्गस्थ झाले. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा उभ्या रिंणगासाठी बाजीराव विहीरीजवळ पोहोचला. त्यावेळी आकाशात ढगांच्या आडून सूर्य डोकावत होता. लाखो वारकर्यांळच्या नजरा माऊलींचा रिंगण सोहळा टिपण्यासाठी आसुसल्या होत्या. मध्येच एखादी वार्याचची झुळुक वारकर्यां च्या मनाला सुखावून जात होती. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला होता. लाडक्या भक्तांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी विठ्ठल रिंगण सोहळ्यात अवतरतो अशी वारकर्यां ची श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. भगव्या पताका धारी वारकर्यां चे जथेच्या जथे नाचत गात हरिनामात तल्लीन होवून रिंगणस्थळी दाखल होत होते. गर्दीने फुललेल्या या स्थळावर येणाऱ्या वारकर्यांच्या दिड्यांनी भक्तीचा महापूर लोटला होता. चोपदारांनी उभ्या रिंगणासाठी अश्व सोडले. सुरूवातीला अश्व बिचकत धावला. त्यानंतर मात्र नेत्रदिपक दौड करीत अश्वाने रथामागील २० दिड्यांपर्यंत जावून आपली प्रदक्षिणा पूर्ण केली. रथाजवळ येताच त्यांने माऊलींचे दर्शन घेतले आणि हा सोहळा आरती नंतर गोल रिंगणाकडे मार्गस्थ झाला.
बाजीराव विहीरीजवळील मोकळ्या शेतात चोपदार व पोलिसांनी रिंगण लावून घेतले. या रिंगणासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक होत होती. चोपदारांनी माऊली व स्वाराच्या अश्वाला रिंगणात सोडले. अश्वांनी ढगाळ वातावरणात नेत्रदिपक दौड करीत २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अश्वांच्या टापाखालील माती भाळी लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. रिंगणानंतर आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्माचा उडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडला. सायंकाळी हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. महाराष्ट्रतून आलेल्या सुमारे ८४ संतांच्या पालख्या रविवारी वाखरीत विसावल्या.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्तबाई, संत सेना महाराज, महर्षि वाल्मिकी, संत जगनाडे महाराज, चौरंगीनाथ, गोविद महाराज, श्रीपाद बाबा, संत गजानन, संत सेवागिरी, दादा महाराज सातारकर, साईबाबा, कान्होपात्रा, चोखामेळा, दामाजीपंत आदि संतांच्या पालख्यांसमवेत सुमारे ७ लाख वैष्णवजनांनी रविवारी पंढरीत प्रवेश केला. संतांच्या पालख्यांवर राज्याचे आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पृष्पवृष्टी करण्यात आली. पाच वर्षांपासून पाचपुते हा उपक्रम राबवित आहेत.

Leave a Comment