ईशान्य भारतातील ज्यूंना इस्त्रायलमध्ये मान्यता

जेरूसलेम दि.५- ईशान्य भारतातील ज्यूंना इस्त्रायलमध्ये सामावून घेण्यासाठी इस्त्रायल सरकारने संमती दिली असून या स्थलांतरीत ज्यूंच्या स्वागतासाठी सरकार उत्सुक असल्याचे सांगितले आहे. ऐतिहासिक अन्यायाची शिकार बनलेल्या या बांधवांच्या स्वागतास आम्ही उत्सुक आहोत असे परराष्ट्र मंत्री अविग्डोर लायबरमन यांनी जाहीर केले आहे.
  भारताच्या ईशान्येकडील मणिपूर आणि मिझोरम राज्यातील ज्यूंनी इस्त्रायलला स्थलांतर करण्याची सुरवात २००७ मध्येच झाली होती आणि त्यावेळी सुमारे १७०० जणांनी स्थलांतर केलेही होते. बेनाई मेनाश म्हणून ओळखले जाणारे हे लोक खरोखरच ज्यू आहेत का अशी शंका घेतली गेल्यामुळे हे स्थलांतर त्यानंतर थांबविण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रयिय मंत्रीमंडळ समितीही स्थापन करण्यात आली हेाती. त्यावर विचार करून या लोकांना इस्त्रायलमध्ये स्थलांतर करण्यास असलेली आडकाठी दूर करण्यात आली आणि त्यांना समावून घेण्यासाठी कृतीआराखडाही तयार करण्यात आला होता. त्यानुसार आता हे ज्यू इस्त्रायलमध्ये स्थलांतरीत होऊ शकतील असे स्थलांतर विभागाच्या मंत्री सोफा लँडव्हर यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment