आयसीआयसीयचा शाखा विस्तार

मुंबई – खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या आयसीआयसीआयने देशातील शाखांचे जाळे वाढविण्याचे ठरविले आहे. येत्या चार वर्षात ही बँक १५०० नव्या शाखा सुरू करणार आहे. सध्या देशात या बँकेच्या २ हजार ५३३ शाखा आहेत तसेच ६ हजार ३०१ एटीएम आहेत. बँकींग सेवेचा विस्तार झपाट्याने होत असल्याने बँकेने शाखांच्या संख्येत वाढ करण्याचे ठरविले आहे. गेल्या आर्थिक वर्षात आयसीआयसीआयने बँक ऑफ राजस्थानचे अधिग्रहण केले होते. परिणामी बँकेच्या शाखांच्या संख्येत ४५० शाखांची भर पडली. संपूर्ण देशात शाखांचा विस्तार करण्यात येणार असून वर्ष २०१५ पर्यंत शाखांची संख्या ४ हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment