महाराष्ट्र बँक आणि एसबीआयचे संयुक्त नवीन क्रेडीट कार्ड

 पुणेः सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची महाराष्ट्र बँक आणि देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाचा उपक्रम असलेल्या एसबीआय कार्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने ’एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडीट कार्डसफ’इ२’ हे क्रेडीट कार्डस् महाबँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. या कार्डाचे उद्धाटन आज सोमवारी महाबँकेच्या ’लोकमंगल’ या मुख्यालयात महाबँकेचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ए.एस्. भट्टाचार्य आणि स्टेट बँकेचे कार्यकारी संचालक दिवाकर गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
     या कार्यक्रमाला महाबँकेचे संचालक कमल राजन आनंद पंडीत डी.एस.पटेल डॉ. एस. यू.देशपांडे एस.एच.कोचेता एस.डी.धनक डॉ.नरेश कुमार कार्यकारी संचालक एम.जी.संघवी एसबीआय कार्डस्चे मुख्य कार्यकारी अधिकारी कदांबी नरहरी ’जीइसीबीपीएमएसएल’चे मुख्य कार्यकार्यकारी संचालक संजीव जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
     महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँकेच्या या सहकार्यामुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देणे शक्य आहे. एसबीआय महाराष्ट्र बँक क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुविधाजनक आणि विश्वासार्ह सेवा देणे शक्य होणार आहे असे भट्टाचार्य यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
     एसबीआय क्रेडीट कार्डस्कडे असलेले तज्ज्ञ मनुष्यबळ आणि प्रभावी तंत्रज्ञान यामुळे आम्ही एसबीआय महाराष्ट्र बँक क्रेडीट कार्डस्च्या ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्यात यशस्वी ठरू शकू असा विश्वास गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
     एसबीआय महाराष्ट्र बँक क्रेडीट कार्डस् प्लॅटिनम आणि गोल्ड या दोन प्रकारात उपलब्ध आहेत.
 

Leave a Comment