भक्तिमार्गाचे विहंगम दृष्य

 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पुण्यातील मुक्काम योगिनी एकादशीला हालविते आणि सार्याब दिड्या दिवा घाटमार्गे पंढरीची वाट चालू लागतात. आजचे बावीस किमीची वायवाट आणि त्यातही डोंगराचे चढण. पण हे चढण चढताना लाखांच्या संख्येने येणाऱ्या वैष्णवांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. दिवाघाटाची एकूण सात वळणे आहेत. चाळीस वर्षापूर्वीची जी छायाचित्रे उपलब्ध आहेत त्यात बहुतेक सारा पालखी सोहोळा चार पाच वळणात दिसायचा. आज सातही वळणावरच्या सोहोळ्याचो वेध घेतला तर एकूण पालखी सोहोळ्याच्या वीस टक्केही सोहोळा येथे मावताना दिसत नाही. भाविकांची संख्या फारच वाढत आहे. दुसरी एक बाब अतिशय स्पष्टपणे लक्षात येत आहे ती म्हणजे त्यात तरुणांची संख्या फार मोठी आहे.

Leave a Comment