अभिनेत्री अनुष्का शर्माची ९ तासांच्या चौकशीनंतर सुटका

मुंबई  – परदेशातून सोने आणि हिर्‍यांचे दागिने तसेच अन्य मौल्यवान वस्तू पूर्वसूचना न देता घेवून आलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ९ तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी सुटका करण्यात आली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनुष्काला सोमवारी सीमाशूल्क अधिकार्‍यांनी तपासणीसाठी थांबविले होते. तिच्याकडे ३५ लाख रूपयांचे सोने आणि हिर्‍यांचे दागिने होते. या वस्तूंबाबत पूर्वसूचना दिली नसल्यामुळे अनुष्काला अडविण्यात आले होते.
टोरंटो येथील पुरस्कार सोहळ्याला गेलेली अनुष्का सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास विमानतळावर आली असता तिला ग्रीन चॅनलवर थांबविल्याचे सीमाशूल्क अधिकार्‍याने सांगितले. तपासणी केली असता तिच्या सामानात दागिने आढळले. हे सर्व आपण मुंबईहून कॅनडाला घेवून गेलो होतो, त्यावेळी आपण परवानगी घेतली होती, असा दावा तिने केला. त्यामुळे आता अडविण्याचे कारण नाही, असेही ती म्हणाली. 

Leave a Comment