लोकपालसाठी गोळ्या देखील खाण्याची तयारी आहे – अण्णा हजारे

पुणे – काँग्रेसने माझ्याबाबत फक्त लाठी चालविण्याची तयारी केली आहे पण मी तर गोळ्या खायची तयारी ठेवली आहे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यानी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जबलपूरयेथे पत्रकारांशी बोलताना बुधवारी कॉग्रेसचे महासचीव दिग्विजय सिग यांनी सांगितले होते की, अण्णा हजारे यांनी परत उपोषण केले तर त्यांची स्थिती बाबा रामदेव यांच्यासारखी केली जाईल. यावर आज त्यांची पुण्यात प्रतिक्रिया विचारण्यात आली त्यावर उत्तर देताना ही हजारे पुढे म्हणाले, अत्याचार आणि भ्रष्टाचार यांतून आपल्याला जनतेला मार्ग काढून द्यायचा आहे. त्यासाठीचे आंदोलन नेहेमीच कठीण असणार हे गृहीत धरले पहिजे, त्या लढ्यात केवळ लाठीकाठी आणि अश्रुधूरावर भागणार नाही.तेथे गोळीबारही होणार. आम्ही महात्मा गांधींचा आदर्श ठेवून लढणारी माणसे आहोत. त्यामुळे अशा धमक्यांनाही आम्ही घाबरत नाही आणि प्रत्यक्ष गोळीबारालाही आम्ही घाबरत नाही.
    अशा धमक्या देणे हाच लोकशाहीचा अर्थ आहे असे जर दिग्विजय सिह समजत असतील तर त्यांना तो अर्थ लखलाभ होवो. आम्हाला जो अर्थ कळतो त्यामध्ये जनतेच्या कल्याणासाठी लोकशाही मार्गाने निर्भय मार्गाने आंदोलन उभे करणे आहे आणि त्यात लढ्यात महात्माजींना जो त्रास झाला तो जर आम्हाला झाला तर बिघडले कोठे अशीच आमची भूमिका आहे. पण सरकारने मात्र एक गोष्ट याबाबत लक्षात ठेवावी की,आतापर्यंतची स्थिती आणि यापुढची स्थिती यामध्ये एक फरक आहे तो म्हणजे आता या आंदोलनामागे जनता आहे., असेही त्यांनी स्पष्ट केले.

1 thought on “लोकपालसाठी गोळ्या देखील खाण्याची तयारी आहे – अण्णा हजारे”

Leave a Comment