देहूमंदिरातून पालख्या पंढरपूरसाठी रवाना

‘ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झालासे कळस’ हा जणू आळंदी आणि देहू येथून निघणार्यार पालखी सोहळ्यातील मंत्रच असतो. सव्वातीनशे वर्षापूर्वी जगत्गुरु तुकाराम महाराज यांनी सुरु केलेला पालखी सोहोळा आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ‘बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ या नामाच्या गजरात सुरु्र झाला. देहूतून निघणार्याा या पालखी सोहोळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे सोबतीला पाउस असतो. तरीही महाराष्ट्रातील कानाकोपर्यावतून पंढरीला जाणारे बरेच वारकरी देहूला येतात. पंढरपूरपर्यतच्या वारीत जवळ जवळ तुकारामाची गाथाच आळविली जाते. या वर्षीच्या तुकाराम महाराज यांच्या वारीचे वैशिष्ठ्य म्हणजे पहिले रिंगण चिचवडच्या संत तुकाराम नगरयेथे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम पालखी यामध्ये पंढरपूरपर्यंत  प्रत्येकी सहा रिंगणे आहेत त्यात यावर्षी चिचवडच्या नागरिकांनी एक रिंगण वाढविण्याची विनंती केली आहे. ती दिडी समितीने मान्यही केली आहे पण पाउस नसेल तरच रिंगण होईल असे सांगण्यात आले आहे.
    इंद्रायणी ही महाराष्ट्राची सरस्वती नदी आहे, असे विनोबा भावे म्हणत असत. एके काळी राजस्तानमधून जाणार्या  सरस्वतीच्या काठावर भारतातील ऋषीमुनींना जगातील पहिले वाङमय म्हणजे चार वेद स्फुरले. त्याच प्रमाणे या इंद्रायणीच्या तीरावर ज्ञानेश्वरी आणि गाथांचे स्फुरण झाले. ती इंद्रायणीही या वारीच्या निमित्ताने आनंदाने फुलून वाहते. आज देहूची पालखी निघाली. आळंदीची पालखी उद्या निघेल. आज पहाटेपासूनच देहुच्या मुख्य मंदिरात लगभग सुरु होती. देहू देवस्थानचे प्रमुख शिवाजीराव मोरे आणि पालखी सोहोळ्याचे प्रमुख तपोनिधी नारायणमहाराज यांच्या हस्ते पहाटेची पूजा झाली. सकाळी ९ वाजता श्री संभाजी महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले.पालखी बरोबर जाण्यासाठी शेकडो दिडया आणि एक लाग वारकरी कालपासूनच येथे मुक्कामाला आले आहेत. दुपारी दोन वाजता दिडयांनी  मंदिरात प्रवेश केला आणि फेर धरून एक एक अभंग आळवण्यास सुरुवात केली. सव्वतीन नंतर मुख्यमंदिरात पूजा झाली व चरण पादुकांना पंढरपूरच्या वारीसाठी स्वाधीन करण्यात आल्या. साडेतीनच्या सुमारास चरण पादुका पालखीत ठेवण्यात आल्या. पालखीने मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण केली आणि बाहेर येअून त्यां पुढच्या प्रवासाला रवाना झाल्या. रिवाजानुसार आज पालख्यांचा मुक्काम देहूमध्येच इनामदार वाड्यात असेल उद्या सकाळी त्या निगडीच्या दिशेने रवाना होतील.

Leave a Comment