पत्रकार हत्येचे गूढ कायम

    मुंबईतील मिड डे या दैनिकातील ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येला आता बरेच दिवस उलटले तरी अजून या हत्येतले आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एवढेच नव्हे तर मुंबईचे पोलीस या खुनातील आरोपीला पकडू शकतील की नाही, अशी शंका वाटावी अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, ही पत्रकारांची मागणी योग्यच होती असे आता वाटायला लागले आहे. सीबीआय तपासाची मागणी  मुख्य मंत्र्यांनी तातडीने नामंजूर केली आणि तपास करण्याची संधी राज्याच्या पोलिसांना दिली पाहिजे, ते त्या दिशेने योग्य वाटचालही करत आहेत असे म्हटले. परंतु मुख्यमंत्र्यांचा या संबंधातला विश्वास अनाठायी असल्याचे आता तरी लक्षात येत आहे. तूर्तास पोलिसांनी जी काही माहिती हस्तगत केलेली आहे किवा हस्तगत केल्याचा दावा केला आहे ती माहिती चुकीची असल्याचे दिसायला लागले आहे. या हत्येमागची कारणे जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत तरी पोलिसांना आरोपीपर्यंत पोचणे अवघड जाणार आहे.
    दरम्यानच्या काळात मतीन शेख उर्फ इक्बाल हतेला या मुंब्रा येथील गुंडाला पोलिसांनी अटक केली होती. एवढेच नव्हे तर त्याने हा खून केल्याची कबुली सुद्धा दिली होती. तेव्हा त्याला न्यायालयात उभे करण्यात आले. तिथे मात्र त्याने पलटी मारली आणि आपण पोलिसांना दिलेला कबुली जबाब चुकीचा होता, असे सांगितले. पोलीस आपल्याकडून कबुली जबाब घेण्यासाठी आपला छळ करतील अशी भीती वाटल्यावरून आपण पोलिसांसमोर कबुली जबाब दिला, असे त्याने न्यायालयात नमूद केले. म्हणजे पोलीस आरोपीपर्यंत पोचलेले आहेत या त्यांच्या दाव्याला मतीन शेख याच्या या कोलांट उडीमुळे मोठा धक्का पोचलेला आहे. तरीही पोलिसांनी मतीन शेखची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे आणि अजून सुद्धा त्याचा तपास सुरू आहे. त्याच्याकडून अजूनही काही माहिती मिळू शकेल असा विश्वास पोलिसांना वाटत आहे. मतीन शेख याने छळवादाच्या भीतीने नव्हे तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटा जबाब दिला असण्याची शक्यताही पोलिसांना वाटत आहे. खऱ्या मारेकऱ्यांना पळून जाण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची संधी मिळावी यासाठी मतीन शेख याने ही युक्ती केली असेल तर तो नक्कीच या मारेकर्यां च्या संपर्कात असणार आहे असे पोलिसांना वाटते.
    पोलिसांना योग्य त्या आरोपीपर्यंत पोचण्यात यश मिळाले नसले तरीही त्यांचे प्रयत्न मात्र कसोशीने सुरू आहेत. आजवर त्यांनी दीडशे लोकांची तपासणी केलेली आहे. पोलीस उप आयुक्त अनिल महाबोले याच्या तपासाला या संबंधात महत्व आलेले आहे. पोलिसानी आपल्याच या अधिकार्यायवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र त्याने या हत्येशी आपला अजिबात संबंध नाही, असे वारंवार निश्चयाने सांगितले आहे. पोलिसांना येमेनमधून एक फोन आला होता आणि हा फोन करणाऱ्या अज्ञात इसमाने जे. डे यांची हत्या इंडियन मुजाहेद्दीन या संघटनेने घडविली असल्याचा दावा केला होता. तूर्तास तरी पोलीस या निनावी फोनला फार महत्व देत नाहीत. कारण जे. डे यांच्या हत्येचा कट असा आंतरराष्ट*ीय पातळीवरून रचला जावा असा काही घडलेले नाही असे त्यांना वाटते. जे. डे यांना संपवावे असे इंडियन मुजाहेद्दीनला वाटावे अशा प्रकारे या संघटनेचे हितसंबंध दुखावतील असे कसलेच लिखाण जे.डे यांनी केलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासाच्या दिशेला वेगळे वळण लावण्याच्या उद्देशाने कोणा तरी खोडसाळ माणसाने हा फोन केला असावा. त्यात तपासाच्या दृष्टीने काही तथ्य नाही असे पोलिसांना वाटते.
    पोलिसांना काहीही वाटले तरी प्रत्यक्षात या निनावी फोन करणार्याय माणसाने हत्येच्या कटाचे तपशील सांगितलेले आहेत आणि त्यामागे भारत, पाकिस्तान आणि दुबईमध्ये कार्यरत असलेल्या संघटनेचा निश्चितपणे हात आहे. पोलीस या दिशेने तपास करतील का? की नेहमीप्रमाणे बेसावध राहतील? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार महमद रफी नावाच्या माणसाने डे यांची हत्या केलेली आहे. हा महमद रफी इंडियन मुजाहेद्दीनचा कार्यकर्ता आहे आणि त्याने या कटासाठी बिहार, हैदराबाद आणि श्रीनगर या तीन ठिकाणचे मारेकरी गुंतवलेले होते. या मारेकर्यां ना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत, अशीही माहिती या अज्ञात व्यक्तीने दिलेली आहे. एकंदरीत जे. डे यांची हत्या अतिशय निष्णात मारेकर्यांवनी केलेली आहे आणि त्याचा तपास करण्यास मुंबईचे पोलीस कमी पडत आहेत. जे. डे यांच्यावर नऊ गोळ्या झाडण्या आल्या होत्या. त्यांच्या उत्तरीय तपासणीत ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. मात्र त्यांच्यावर झाडण्यात आलेल्या या नऊ गोळ्यांपैकी तीन गोळ्या आता सापडेनासे झाले आहेत. मुंबईच्या पोलिसांची पुरावे गोळा करण्यातली ही तत्परता अशीच असेल तर जे. डे यांच्या हत्येचा तपास त्यांच्याकडून यशस्वीरित्या होण्याची शक्यता कमीच आहे आणि या प्रकारामुळे राज्यातल्या पत्रकारांध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.