वारकऱ्यांसाठी राज्य शासनाचा २६० कोटी रुपयांचा निधी

पुणे: पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळ विकसित करण्यासाठी राज्यशांसनाने २६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्येक मुक्कामाच्या गावी २५ एकर जागेवर पालखी तळ विकसित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  
     पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाणी पुरवठामंत्री लक्षमणराव ढोबळे, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, पुणे व पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, देहू देवस्थानाचे अध्यक्ष शिवाजीराव मोरे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त डॉ. प्रशांत सुळू यांच्यासह अनेल्क लोकप्रतिनिधी, वारकर्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     पालखी मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीची उर्वरीत कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले असून पालखीचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्याठिकाणी वीज भार नियमन ना करण्याच्या सूचनाही विद्युत वितरण विभागाला देण्यात आल्या. पालखी सोहलाच्या काळात नीरा उजवा आणि डावा या दोन्ही कालव्यात आणि नदीपात्रात पाणी वाहते ठेवण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. 
     पालखी सोहल्या  दरम्यान वारकर्यांची गैरसोय होऊ नये आणि स्वच्छता राहावी यासाठी पालखी मार्गावरील महापालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषद यांच्यावतीने फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली जाते. मात्र प्त्रत्यक्षात जेव्हा दोन्ही पालख्या आणि लाखो वारकर्यांचा जनसमुदाय पंढरपूर येथे येतो तेव्हा त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालये उपलब्ध नसतात त्यामुळे पालखी मार्गावर उपलब्ध करून दिलेली शौचालये पंढरपूरपर्यंत वारीसोबत ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
     पालखी मार्गावर लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक त्वरित काढून टाकावे असे आदेश पवार यांनी दिले. ही जबाबदारी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधीकार्यावर सोपविण्यात आली असून त्यांना सहकार्य करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. पालखी मार्गावर अवैध रित्या मद्य व गांजा विक्री आणि ध्वनिवर्धक यावर नियंत्रण ठेवण्याबाबत जागरूक राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
     मागील वर्षी शासनाकडून वारीनंतर स्वच्छता आणि तदनुषंगिक कामासाठी मान्य करण्यात आलेले २ कोटी रुपयांचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याकडे पंढरपूरच्या नगरध्यक्षाण्नी लक्ष वेधले असता मागील आणि यावर्षीचे अनुदान यावर्षी पालखी पंढरपूरला येण्यापूर्वी दिले जाईल अशी ग्वाही पवार यांनी दिली.
     पावसाचा अथवा उन्हाचा विचार करून एकादशीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या जास्तीत जास्त वारकर्यांना छत्र मिळावे म्हणून शेड मोठी करण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यावर्षी दर्शन मंडपात आणि अन्य ठिकाणी सी सी टीव्ही केमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच पाच नियंत्रण कक्ष आणि टेहाळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत, असे सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले.
चौकट
वारकरी वाढले; चालणारे घटले
सध्या दरवर्षी वारकयांच्या संख्येत वाढ होत असली तरीही चालणार्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे दिंड्यांमध्ये गाड्यांची संख्या वाढत आहे. वारीच्या वाटचालीत यामुळे अडथळा येतोच; पण वारीच्या परंपरेला धक्का बसून तो बघणार्यांना पर्यटनाचा प्रकार वाटतो; अशी टीका या चर्चेत करण्यात आली. दिंडीत शक्यतो मालवाहू वाहनाशिवाय इतर वाहने असणार नाहीत याची काळजी दिंडी प्रमुखांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले. दोन वर्शापूर्वीपर्यंत वारीत सहभागी होणार्या गाड्यांची तपासणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण करीत असे. ती पुन्हा सुरू करण्यात यावी; अशी मागणीही यावेळी करण्यात आली.    

Leave a Comment