
दबंगमध्ये गावातील साध्या युवतीची भूमिका केल्यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता चांगल्या ग्लॅमरस भूमिकांच्या शोधात आहे.अब्बास-मस्तान याच्या रेस २ चित्रपटात सोनाक्षी ग्लॅमरस भूमिका करणार आहे.कोणत्याही अभिनेत्रीने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला हव्यात,असे मला वाटते.रेस २ मधील भूमिका मी त्याचसाठी स्वीकारल्याचे सोनाक्षीने स्पष्ट कले.
पारंपारिक युवतीची प्रतिमा बदलून ग्लॅमरस होण्याचा माझा प्रयत्न आहे, असे सोनाक्षीने फिक्की फ्रेम्स पुरस्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. सोनाक्षी आपले वजन कमी करुन शरीर अधिक आकर्षक करण्याच्या प्रयत्नात आहे. जोकर आणि रेस २ या चित्रपटांसाठी मला सुबक आकार आणणे गरजेचे आहे, असेही सोनाक्षीने सांगितले.
shi is very very beuty fool