विधानसभेतील विरोधकांची बाके रिकामीच

मुंबई दि.२८ – अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत गदारोळ करणाऱ्या नऊ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे तसेच विकासनिधी वाढवून द्यावा,यासाठी सोमवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसणे पसंत केले.त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांनी एकतर्फी कामकाज सुरु ठेवून दुपारी दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.

सोमवारी दुपारी १२ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले. परंतु विरोधी पक्षाची बाके रिकामीच होती, त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी सत्तारुढ पक्षाच्या बाजूने एकतर्फी कामकाज सुरु ठेवले. प्रश्नोत्तराचा तास, कागदपत्रे सभागृहात ठेवणे, लक्षवेधी, अर्थमंत्र्यांचा नियम ५७ अन्वयेचा प्रस्ताव यावर सभागृहात चर्चा झाली. परंतू अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चेचा पहिला दिवस असूनही सदर चर्चा पुढे ढकलण्यात आली. विधानभवनाच्या पायर्यासवर विरोधक पुन्हा ठाण मांडूल बसले होते तर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि महत्वाच्या गटनेत्यांची बैठक सुरु झाली. विरोधी पक्षाचा बहिष्काराचा तिढा सुटलाच नाही.

Leave a Comment