‘युलिप’ च्या मागणीत घट

मुंबई दि.२८ – केंद्र सरकारने प्रत्यक्ष कर संहिता लागू करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने ‘युलिप’ योजनांबाबत गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.याचा फटका विमा कंपन्यांना बसत असून गेल्या काही दिवसांपासून ‘युलिप’ योजनांची मागणी घटली आहे.प्रत्यक्ष कर संहिता १ एप्रिल २०१२ पासून अंमलात येणार आहे आणि यात या योजनेत गुंतवणूक केल्यास मिळणारी कर सवलत काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ’युलिप’ च्या नियमांमध्ये बदल केल्यामूळे गुंतवणुकदारांची यात अधिक गुंतवणूक यायला हवी होती पण कर संहितेमुळे ती येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी विमा कंपन्या ’युलिप’ ऐवजी इतर योजना विक्री करण्यावर भर देत आहेत. ’युलिप’ योजनांतून जमा होणार्याज प्रिमियममध्ये ५० टक्के घट झाली आहे. आणि यापुढे ’युलिप’ योजना उठाव घेण्याची शक्यता ही कमी आहे.

Leave a Comment