महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक प्रस्ताव

मुंबई दि.२८ – वर्ष १९९१ ते २०१० या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक औद्योगिक प्रस्ताव आल्याचे एका अहवालाद्वारे दिसून आले आहे.पायाभूत सुविधांची उत्तम व्यवस्था,कुशल मनुष्यबळ आणि स्थिर सामाजिक परिस्थिती यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीत सर्वोत्तम ठरत असल्याचे सदर अहवालात दिसून आले आहे.गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा वाटा क्रमशः १० आणि १५ टक्के इतका आहे.

महाराष्ट्राने सदर कालावधीत १६ हजार १४० इतके गुंतवणुकीचे प्रस्ताव मान्य केले तर गुजरातने १० हजार ६६६ इतके प्रस्ताव मान्य केले. या प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रात ३०.२४ लाखांना रोजगार मिळाला तर गुजरातमध्ये १९.४९ लाख लोकांना रोजगार मिळाला. गुजरातमध्ये ८ लाख ५९ हजार ७८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर महाराष्ट्रात केवळ ६ लाख ९५ हजार ५१६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. अन्य राज्यांचा विचार केला तर तामिळनाडूमध्ये ८ हजार ५०२ प्रस्ताव आले आणि या राज्यात ३ लाख ५४ हजार ७१० कोटींची गतवणूक झाली. आंध्र प्रदेशात ७ हजार २३७ प्रस्ताव आले आणि ६ लाख ९४ हजार ६४० कोटींची गुंतवणूक झाली. उत्तर प्रदेशात ७ हजार ३८० प्रस्ताव आले आणि २ लाख २६ हजार २३२ कोटींची गुंतवणूक झाली. महाराष्ट्रात जे प्रस्ताव आले, त्यातील ८ हजार ३२२ प्रकल्पांचे काम सुरु झाले. यातील गुंतवणूक १ लाख ९५ हजार ४०७ कोटी रु. इतकी होती. तर प्रत्यक्षात ८ लाख ४५ हजार ७२३ लोकांना रोजगार मिळाला.

Leave a Comment